पुण्यात आज होणाऱ्या विकासकामांचं भूमिपूजन होणार आहे. मात्र यावरून महायुतीत वाद रंगताना दिसत आहे. वडगावशेरीमध्ये तीनशे कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन होत आहे. त्यासंदर्भात अजित पवार गटाने बॅनरबाजी केली. मात्र त्यावर शिंदे आणि फडणवीसांचा फोटो वापरलाच नाही, त्यावरुन भाजपचे नेते जगदीश मुळीक यांनी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरेंवर निशाणा साधलाय. महायुती धर्म फक्त आम्हीच पाळायचा का? विकासकामांचं श्रेय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचही आहे. मग पोस्टरवर फोटो फक्त अजित पवारांचाच कशासाठी? असा सवाल जगदीश मुळीक यांनी ट्विट करुन विचारला आहे. अजित पवारांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनापूर्वीच मुळीक विरूद्ध टिंगरे भिडल्याने महायुतीत ऑल इज नॉट वेल असे चित्र दिसत आहे. मागे झालेल्या जनसन्मान यात्रेवेळी देखील शिवसेना, भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद पाहायला मिळाला होता.
वडगाव शेरी विधानसभेत महायुतीचा धर्म काय भाजप आणि शिवसेनेनीच पाळायचा का?
— Jagdish Mulik (@jagdishmulikbjp) August 25, 2024
महायुतीचा धर्म पाळणं, ही महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाची जबाबदारी आहे, पण वडगावशेरीच्या या आमदारांना महायुतीचा विसर पडला आहे !
वडगावशेरीमध्ये तीनशे कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन होत आहे, हे नागरिकांच्या… pic.twitter.com/CvcDhAkWXm
महायुतीत सध्या वादाची ठिणगी उडू लागली आहे. कालच रत्नागिरीत माजी भाजप आमदार आणि मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये एमआयडीसी प्रकल्पावरुन शाब्दिक बाचाबाची झाले आहे. अशातच आता पुण्यात सुद्धा महायुतीचा वाद उफाळलेला दिसतोय. वडगावशेरीत महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. विकासकामाच्या भूमिपूजनावरून राष्ट्रवादी विरुद्ध भाजप - शिवसेनेत वाद रंगला आहे. माजी आमदार आणि भाजपा नेते जगदीश मुळीक यांनी राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर निशाणा साधला आहे. वडगाव शेरी विधानसभेत महायुतीचा धर्म काय फक्त भाजप आणि शिवसेनेनीच पाळायचा का? असा सवाल भाजप नेते जगदीश मुळीक यांनी केला आहे.
नक्की वाचा - भावी नाही तर 'फिक्स आमदार'; युगेंद्र पवारांच्या त्या फ्लेक्सची का होतेय चर्चा?
अजित पवारांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनापूर्वीच मुळीक टिंगरे भिडल्याने महायुतीत ऑल इज नॉट वेल असे चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवारांच्या नेतृत्वात राज्यात जनसन्मान यात्रा काढली आहे. हीच यात्रा आज जुन्नरमध्ये पोहोचली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world