जाहिरात

आषाढी वारीसाठी पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; पालखी मार्गावरील महत्त्वाचे रस्ते बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

यंदा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या कालावधीत वाहतूक मार्गावरील महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

आषाढी वारीसाठी पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; पालखी मार्गावरील महत्त्वाचे रस्ते बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Pune News : आषाढी वारी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनात साठवून लाखो भाविक राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपुरात येत असतात. यंदा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. यादृष्टीने ग्रामीण हद्दीत पालखी प्रस्थान सोहळा बंदोबस्त ११ ते १५ जुलै या कालावधीत आहे. या कालावधीत पालखी मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करुन वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत.  

पुणे आणि परिसरातील कोणकोणते रस्ते बंद राहणार? 

पुणे ते सासवड (सासवड मुक्काम): ११ जुलै रोजी पहाटे २ वाजल्यापासून ते १३ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याहून सासवडकडे दिवेघाट आणि बोपदेव घाटमार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहने खडी मशीन चौक-कात्रज-कापूरहोळ मार्गे जातील. सासवडकडून पुणे बाजुकडे येणारी वाहतूक गराडे-खेड-शिवापूर मार्गे वळविण्यात येणार आहे. 

सासवड ते जेजुरी (जेजुरी मुक्काम) आणि जेजुरी ते वाल्हे (वाल्हे मुक्काम): १३ जुलै रोजी पहाटे २ वा. पासून ते १४ जुलै राजी १२ वा. पुणे येथून सासवड-जेजूरी-वाल्हे-निराकडे तसेच नीरा येथून पुणेकडे जाणाऱ्या वाहनांनी झेंडेवाडी-पारगाव मेमाणे-सुपे-मोरगाव-नीरा या मार्गाचा वापर करावा.

नक्की वाचा - Pune News : पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार? केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टच सांगितलं...

वाल्हे ते लोणंद (लोणंद मुक्काम): १५ रोजी पहाटे २ वा पासून ते १५ रोजीचे सायं ५ वा. पर्यंत पुणे येथून सासवड-जेजुरी-वाल्हे-नीराकडे तसेच नीरा येथून पुणेकडे जाणाऱ्या वाहनांनी सासवड-जेजुरी-मोरगाव या पर्यायी मार्गाचा वापर वापर करावा.

लोणंद येथून पुढे फलटण मार्गे: १५ ते १८ जुलै या कालावधीत फलटण लोणंद येथून पुणे येथे येणारी वाहतूक शिरवळमार्गे पुणेकडे येतील. तसेच पुणे येथून फलटण व लोणंदकडे जाणारी वाहतुक शिरवळमार्ग जाईल. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी डुडी यांनी केले आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com