Pune All India Radio : २ ऑक्टोबर १९५३ रोजी आकाशवाणी पुणे केंद्राची स्थापना झाली. भारताचे तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या हस्ते आकाशवाणीची पुणे केंद्राची स्थापना झाली. ७३ वर्षांचा इतिहास असलेला पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार असल्याची चर्चा सुरू आहे. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं दिसून येत आहे.
आकाशवाणी पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग बंद होणार?
आकाशवाणी पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग बंद होण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. 'भारतीय माहिती सेवा' अधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्याने हा विभाग बंद होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र हा विभाग बंद होणार नाही अशी ग्वाही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
नक्की वाचा - लोणावळा विरुद्ध महाबळेश्वर, काय सर्वात भारी? पुढच्या ट्रिपसाठी बेस्ट ठिकाण कसं निवडाल?
वैष्णव हे पुणे दौऱ्यावर आले असताना त्यांच्याशी यासंदर्भात पुण्याचे खासदार आणि हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी चर्चा केली. या चर्चेनंतर पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही अशी ग्वाही वैष्णव यांनी दिली. त्यामुळे पुणेकरांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. ७० वर्षांहून अधिक वर्षाचा गौरवशाली इतिहास असलेल्या या केंद्रावर आजही शेती, स्थानिक माहिती आणि सांस्कृतिक माहिती प्रसारित केली जाते. आजही पुण्यात याचा श्रोता वर्ग आहे जो नियमित आकाशवणीवरुन वृत्तही ऐकत असतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world