जाहिरात

Malegaon News : मालेगाव पालिकेत नगरसेवकांचा 'राडा'! एमआयएम आणि इस्लाम पक्ष आमनेसामने, सभागृहात हाणामारी

Malegaon Municipal Corporation: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महापालिकेची विशेष महासभा गुरुवारी रणधुमाळीत पार पडली.

Malegaon News : मालेगाव पालिकेत नगरसेवकांचा 'राडा'! एमआयएम आणि इस्लाम पक्ष आमनेसामने, सभागृहात हाणामारी
Malegaon Municipal Corporation: या वादाचे रूपांतर थेट धक्काबुक्की आणि हाणामारीत झाले.
मालेगाव:

निलेश वाघ, प्रतिनिधी

Malegaon Municipal Corporation: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महापालिकेची विशेष महासभा गुरुवारी रणधुमाळीत पार पडली. निवडणूक आयोगाच्या मतदार यादी पडताळणी आणि नकाशीकरण (एसआयआर) प्रक्रियेसाठी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करण्याच्या मुद्द्यावरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या वादाचे रूपांतर थेट धक्काबुक्की आणि हाणामारीत झाल्याने सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

वादाचे कारण काय?

निवडणूक आयोगाच्या बीएलओंना मदत करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे मानधन तत्त्वावर सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करावेत, असा ठराव सत्ताधारी मालेगाव सेक्युलर फ्रंटने मांडला होता. या नियुक्त्या पारदर्शक असाव्यात आणि जिल्हाधिकाऱ्यांनी याला परवानगी द्यावी, असा यामागचा उद्देश होता. 

Latest and Breaking News on NDTV

मात्र, एमआयएमचे नगरसेवक डॉ. खालिद परवेज यांनी या नियुक्त्यांच्या नियमावलीवर आणि मानधनाच्या तरतुदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उपमहापौर शान ए हिंद यांनी दिलेल्या उत्तरावर विरोधकांचे समाधान न झाल्याने वादाची ठिणगी पडली.

( नक्की वाचा : Chhatrapati Sambhajinagar: शिंदेंची कोंडी, ठाकरेंची फाटाफूट! संभाजीनगर ZP मध्ये भाजपाने असा फिरवला सत्तेचा गेम )

सभागृहात नगरसेवकांची धक्काबुक्की

चर्चा सुरू असतानाच वाद विकोपाला गेला आणि महापौरांच्या आसनासमोरच सत्ताधारी व विरोधी नगरसेवक समोरासमोर आले. इस्लाम पार्टीचे नगरसेवक करण चव्हाण आणि एमआयएमचे नगरसेवक हनीफ शेख यांच्यात जोरदार बाचाबाची होऊन धक्काबुक्की झाली. या प्रकारामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला आणि दोन्ही गटाचे नगरसेवक आपापसात भिडले. 

Latest and Breaking News on NDTV

खेर शिवसेनेच्या नगरसेवकांनी मध्यस्थी केल्यावर हा वाद शांत झाला. मात्र, या गोंधळाचा निषेध करत एमआयएमच्या नगरसेवकांनी महासभेतून सभात्याग केला.

गदारोळातच ठराव मंजूर

विरोधी पक्षाचा विरोध आणि सभात्याग सुरू असतानाच, सत्ताधारी गटाने प्रचंड गदारोळात हा ठराव मंजूर केला. महापौर नसरीन शेख यांनी या विषयाला मंजुरी देत असल्याची घोषणा केली. हा मंजूर झालेला ठराव आता अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या महासभेला आयुक्त रवींद्र जाधव आणि नगरसचिव साजिद अहमद यांची प्रमुख उपस्थिती होती.

या गोंधळामुळे महासभेचे कामकाज काही काळ ठप्प झाले होते. मालेगाव महापालिकेत यापूर्वीही इस्लाम पार्टी आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये खटके उडाल्याच्या घटना घडल्या आहेत. आजच्या या प्रकारामुळे महापालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. या चर्चेत नरेंद्र सोनवणे, निलेश आहेर, इरफान अली आणि मुस्तकीम डिग्निटी यांसह अनेक नगरसेवक सहभागी झाले होते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com