जाहिरात

Malshej Ghat Tourism: मनमोहक धबधब्यांनी माळशेज घाट बहरला! 'हे' स्पॉट ठरतायेत मुख्य आकर्षण

Malshej Ghat Sahyadri Tourism: धुक्याची चादर, उंच कड्यांवरून पडणारे पाण्याचे झरे आणि पाण्याच्या पडझडीचा आवाज निसर्गप्रेमींना आकर्षित करत आहे.

Malshej Ghat Tourism: मनमोहक धबधब्यांनी माळशेज घाट बहरला! 'हे' स्पॉट ठरतायेत मुख्य आकर्षण

अविनाश पवार, पुणे:

Malshej Ghat Tourism: पावसाळा सुरू होताच सह्याद्रीच्या रांगांमध्ये निसर्ग सौंदर्य अधिक खुलते आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अहिल्या नगर कल्याण महामार्गावरील माळशेज घाट परिसरात पावसामुळे हिरवाईचे दुलई पसरली असून, घाटातील दऱ्या, कडे, पठारे आणि डोंगर माथे नवे रूप घेऊन नटले आहेत. या पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. 

घाटमाथ्यावरून खाली कोसळणारे अनेक छोटे-मोठे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. विशेषतः काळू धबधबा आणि परिसरातील मोठे धबधबे पूर्ण क्षमतेने वाहू लागले आहेत, तर छोटे छोटे धबधबे सुद्धा या भागातील सौंदर्यात भर टाकत आहेत. धुक्याची चादर, उंच कड्यांवरून पडणारे पाण्याचे झरे आणि पाण्याच्या पडझडीचा आवाज निसर्गप्रेमींना आकर्षित करत आहे.

Matheran : माथेरानात तोबा गर्दी, विकेंडला 50 हजारांहून अधिक पर्यटकांची हजेरी, रस्त्यावर रांगा; टॅक्सीचालक हैराण!

रिव्हर्स वॉटरफॉलचे वैशिष्ट्ये
माळशेज घाटातील धबधबे रिव्हर्स वॉटरफॉल म्हणून प्रसिद्ध आहेत. उंच कड्यावरून खाली पडणारे पाणी, जोरदार वाऱ्यामुळे उलट दिशेने वर उडताना दिसते, ही दृश्ये पर्यटकांना अनोखा अनुभव देतात. अनेक पर्यटक खास या दृश्याचा आनंद घेण्यासाठी येथे दाखल होत आहेत.

हिरवाईने नटलेला प्रदेश
संपूर्ण परिसरात हिरवळीचा गडद रंग पसरला असून, झाडाझुडपांचे पानांवरून घसरणारे पाणी, जमिनीवरून वाहणारे पाण्याचे छोटे झरे, तसेच पावसाच्या सरींमध्ये चमकणारे डोंगर निसर्गप्रेमींना फोटो काढण्यासाठी आकर्षित करत आहेत. काही ठिकाणी धुक्यात हरवलेले रस्ते, तर काही ठिकाणी घाटातून उघडणारे नयनरम्य दृश्य पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.

पर्यटकांची वाढती गर्दी
पावसाळ्यातील शनिवार-रविवारी विशेषतः पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक भागातील पर्यटक मोठ्या प्रमाणात घाटात दाखल होत आहेत. काही पर्यटक धबधब्यांच्या पाण्यात मनसोक्त भिजून आनंद घेत आहेत, तर काही निसर्गदृश्याचा आनंद घेत फोटो व व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद करत आहेत.

Alibaug Tourist Places : विकेंडला माथेरान, अलिबागमध्ये वाहतूक कोंडीशिवाय मनसोक्त फिरा; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

काही सूचना
– पावसामुळे रस्ते ओले व घसरडे झाले असल्याने वाहन चालकांनी काळजीपूर्वक वाहन चालवावे.
– घाटातील काही ठिकाणी दाट धुके व कमी दृश्यमानता असल्यामुळे वेग मर्यादेत ठेवावा.
– पाण्यात उतरताना पाण्याचा वेग, कड्यांची उंची आणि जागेची सुरक्षितता तपासून उतरणे गरजेचे आहे.
– प्लास्टिक व कचरा फेकणे टाळावे, निसर्ग स्वच्छ ठेवावा.

निसर्गप्रेमींसाठी खास पर्वणी
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या माळशेज घाटातील हे पावसाळी निसर्गाचे रूप पर्यटकांसाठी खास पर्वणी ठरते आहे. पावसाचा जोर, हिरवाई, धबधबे, धुके, थंड वारे यामुळे ताजेतवाने होण्यासाठी माळशेज घाट हा पावसाळ्यातील उत्तम पर्याय ठरू शकतो.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com