मंगेश जोशी, जळगाव
Jalgaon News : गुजरातमधून 400-425 किमी प्रवास करुन जळगावात आलेल्या तरुणाने अमळनेरमध्ये आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अमळनेर बस स्थानकाजवळ असलेल्या लॉजमध्ये तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सौरभ शर्मा असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सौरभ शर्मा हा तरुण अहमदाबाद येथील रहिवासी होता. त्याच्याविरुद्ध अहमदाबादमध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा देखील दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान आपल्या प्रेयसीला व्हिडीओ कॉल करून या तरुणाने लॉजमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.