जाहिरात

Kolhapur News : प्रेमसंबंध, लिव्ह इन अन् हत्या; मैत्रिणीसमोरच प्रेयसीला तडफडवून मारलं

Kolhapur News : करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी इथल्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये त्यांचं वास्तव्य होतं. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये धुसफूस सुरू होती.

Kolhapur News : प्रेमसंबंध, लिव्ह इन अन् हत्या; मैत्रिणीसमोरच प्रेयसीला तडफडवून मारलं

विशाल पुजारी, कोल्हापूर

Kolhapur News : लिव्ह अँड रिलेशनशिपचा ट्रेंड हल्ली वाढताना दिसून येतोय. मात्र हाच ट्रेंड काहींच्या जीवावर बेतत आहे. कोल्हापुरातल्या घटनेनंतर या लिव्ह अँड रिलेशनशिपचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. एका तरुणीचा प्रेम संबंधातून खून करण्यात आला. गेली काही महिन्यात संबंधित तरुणी आणि संशयित आरोपी तरुण संपर्कात होते. त्यानंतर लग्नास नकार दिल्यानंतर हे प्रकरण घडलं. गांधीनगर पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे. 

(नक्की वाचा- 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथे एका तरुणीचा खून करण्यात आला. समीक्षा नरसिंगे असं या मृत तरुणीच नाव आहे. ती कसबा बावडा येथील रहिवासी आहे. 2018 साली तिचा विवाह झालेला. मात्र त्यानंतर पती आणि तिच्यात मतभेद निर्माण झाले होते. तेव्हापासून ती सतीश यादव या मित्राच्या संपर्कात होती. या मित्राने लग्नासाठी तिला विचारले होते. मात्र तिने नकार दिला म्हणून तिची चाकू खुपसून हत्या करण्यात आली.

इव्हेंट मॅनेजमेंटच्या कामातून दोघांची ओळख

इव्हेंट मॅनेजमेंटच्या कामातून दोघांची ओळख झाली होती. त्यातून त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले. करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी इथल्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये त्यांचं वास्तव्य होतं. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये धुसफूस सुरू होती. त्यातूनच सतीश यादव यानं आज दुपारी समिक्षा नरसिंगे या तरूणीचा छातीमध्ये सुरा खुपसून खून केला. घटनेनंतर तो पसार झालाय. समिक्षाला सीपीआरमध्ये दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितलं. संशयित सतीश यादवच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथकं रवाना झाली आहेत.

(नक्की वाचा - EXPLAINER : डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? कोट्यवधींची फसवणूक कशी होते? वाचा सविस्तर)

एका अपार्टमेंटमध्ये भाडेतत्वावर फ्लॅट घेऊन लिव्ह अँड रिलेशिनशिप

कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या जयभवानी गल्लीत भरत नरसिंगे हे पत्नी सुवर्णा, मुलगी समिक्षा, गौतमी आणि मुलगा वैभव यांच्यासह राहत होते. सात वर्षापूर्वी भरत नरसिंगे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे कुटूंब उघड्यावर पडलं. मुलांची जबाबदारी पडल्यानं, सुवर्णा यांनी मासे विकून कुटूंबाची गुजरान सुरू केली. दरम्यान त्यांची थोरली मुलगी समिक्षाचा कोल्हापुरातील एका तरूणाबरोबर विवाह झाला होता. त्यानंतर त्यांच्यात वितुष्ट आलं. त्यानंतर समिक्षानं इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करण्यास सुरवात केली. काही महिन्यापूर्वी तिची ओळख मुळचा उंड्री आणि सध्या शिवाजी पेठेत राहणारा सतीश यादव याच्याशी झाली. तोही खाजगी ठिकाणी काम करत होता. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. तीन महिन्यांपूर्वी सतीश यादवनं सरनोबतवाडी इथल्या एका अपार्टमेंटमध्ये भाडेतत्वावर फ्लॅट घेतला होता. या फ्लॅटमध्ये समिक्षा नरसिंगे आणि सतीश यादव हे लिव्ह ऍन्ड रिलेशिनमध्ये राहत होते. 

समीक्षाच्या मैत्रिणीने दिली खुनाबाबत माहिती 

मृत समीक्षा राहत असलेल्या फ्लॅटमध्ये तिची मैत्रीण आयषु आंबले ही देखील राहत होती. तिही इव्हेंटमॅनेजमेंटचं काम करत होती. तिने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून समिक्षा आणि सतीश यांच्यामध्ये खटके उडू लागले होते. त्यामुळे वैतागून समिक्षा आणि तिची मैत्रिण आयषु या दोघी कसबा बावड्यातील आईच्या घरी राहत होत्या. गेल्या तीन दिवसांपासून सतीश यादव आयषु हिला वारंवार फोन करून समिक्षाला भेटायचं असल्याचं सांगत होता.  त्यानंतर 3 जून रोजी समीक्षा आणि सतीश या दोघांची ते राहत असलेल्या फ्लॅटमध्ये भेट झाली. त्यानंतर हा खून झाला. 

(नक्की वाचा - Sunita Jamgade Nagpur : LOC ओलांडण्याचा सीन रिक्रिएट करणार, सुनीताला नेण्यासाठी लडाख पोलिसांची टीम नागपुरात)

रागात असलेल्या सतीशचा अचानक चाकूनं समिक्षावर हल्ला

3 जून रोजी दुपारी एक वाजता समिक्षा आणि आयषु दुचाकीवरून सरनोबतवाडी इथल्या फ्लॅटवर गेल्या. तिथे सतीश यादव आला. त्याच्याकडे फ्लॅटची किल्ली होती. रूममधील साहित्य घेऊन घरी जायचं असा समिक्षा आणि आयषुचा प्लॅन होता. मात्र रागात असलेल्या सतीश यादवनं अचानक त्याच्याकडील चाकूने समिक्षावर हल्ला केला. त्याला रोखण्यासाठी आयषुनं प्रयत्न केला. मात्र तिच्याही हाताला जखम झाली. अशातच सतीशनं समिक्षाच्या छातीमध्ये भोकसल्यानं ती जमिनीवर कोसळली. प्रचंड रक्तस्त्राव होऊ लागला. संधी साधून सतीश यादवनं त्या ठिकाणाहून पळ काढला. 

जाताना दरवाजाला बाहेरून कडी घातली. त्यामुळे समिक्षाला लवकर वैद्यकीय मदत मिळाली नाही. ती तडफडत होती. दरम्यान आयषुनं तिचा वसगडे इथला मित्र अभिषेक सोनवणे याला फोन केला. त्याने येऊन रूमचा दरवाजा उघडला. त्यानंतर खाजगी वाहनातून प्रथम राजारारामपूरीतील खाजगी रूग्णालयात तर नंतर सीपीआरमध्ये समिक्षाला दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितलं. दरम्यान करवीरचे पोलीस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर, लक्ष्मीपूरीचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, गांधीनगरचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी आणि सीपीआरमध्ये माहिती घेतली. तसेच संशयित सतीश यादव याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांसह विविध पथकं रवाना झाली आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com