जाहिरात

नारायणगडावर तेवढं बोलायचं राहिलं, पण आता सांगतो; मनोज जरांगेंचा NDTV वर गौप्यस्फोट!

पण जे गडावर बोलता आलं नाही, ते मनोज जरांगे यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले.

नारायणगडावर तेवढं बोलायचं राहिलं, पण आता सांगतो; मनोज जरांगेंचा NDTV वर गौप्यस्फोट!
जालना:

मोसिन शेख, प्रतिनिधी

मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा शनिवारी बीड जिल्ह्यातील नारायण गडावर (Narayangad) दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या दसरा मेळाव्यातून त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं. या सोबतच आचारसंहिता लागण्यापूर्वी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा असा थेट इशारा सरकारला दिला. पण याचवेळी अनेक राजकीय गोष्टी मला गडावर बोलता येणार नाही असेही जरांगे म्हणाले. पण जे गडावर बोलता आलं नाही, ते मनोज जरांगे यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना जरांगे यांनी मोठा गौप्यस्फोट देखील केला आहे.

फडणवीस यांच्यावर आरोप करताना मनोज जरांगे म्हणाले की,'फडणवीसांची त्यांच्या सहकाऱ्यांसोबत बैठक झाली. ज्यात गोड बोलून मराठा समाजाचे काही उमेदवार द्यायचे, पण त्यांना पाडायचे देखील असे ठरले आहे. मला हे सर्व काही गडावर बोलायचं होतं. मला हे सर्व काही गडावर ओपन करायचं होतं. पण आता सांगतो असेही जरांगे म्हणाले. यांची आतून एक बैठक झाली, ज्यात मराठा समाजाचे आपणच उमेदवार उभे करायचे आणि पाडायचे देखील. मराठ्यांना यावेळी काही द्यायचं नाही, मात्र बाकीच्यांना गोळा करायचं आणि सत्तेकडे जायचं अशी देखील चर्चा झाली असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. 

Baba Siddiqui News : 48 वर्षे काँग्रेसमध्ये, 8 महिन्यांपूर्वी अजित पवार गटात प्रवेश; कोण होते बाबा सिद्दीकी?

नक्की वाचा - Baba Siddiqui News : 48 वर्षे काँग्रेसमध्ये, 8 महिन्यांपूर्वी अजित पवार गटात प्रवेश; कोण होते बाबा सिद्दीकी?

फडणवीसांनी आता मविआ कडून लिहून घेतलं का?
पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की, सोळा-सतरा जाती आरक्षणात घातल्या. आता देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावं की महाविकास आघाडीकडून त्यांनी लिहून आणलं का?, आदिवासींचं विरोध असताना देखील धनगर समाजाला एसटीत घालताना महाविकास आघाडीकडून लिहून आणलं का? असा टोला जरांगे यांनी लगावला. तर, जे माकड बोलत होते मराठ्यांमुळे ओबीसीला धक्का लागू शकतो,आता त्यांना धक्के लागत नाही का?, आता काय तुम्हाला लकवा भरला आहे. मराठ्यांना एवढं वैरी समजायला गरज नव्हती, आता याचे परिणाम तुम्हाला कळतील असा इशारा देखील जरांगे यांनी दिला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
काँग्रेसच्या 'त्या' आमदारावर अखेर निलंबनाची कारवाई, पक्षा विरोधात भूमिका भोवली
नारायणगडावर तेवढं बोलायचं राहिलं, पण आता सांगतो; मनोज जरांगेंचा NDTV वर गौप्यस्फोट!
baba-siddique-shot-dead-in-mumbai- Contract-Killers-got-rs-200000-to-kill-baba-siddiqui
Next Article
Baba Siddique बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी कितीची सुपारी? प्रत्येकाला मिळणार होते...