जाहिरात

Manoj Jarange Murder Plan: धनंजय मुंडेंचं काय खरं नाय! मनोज जरांगेंची SP कार्यालायत धाव, 'त्या' 15 लोकांनी..

Manoj Jarange Patil Latest News : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आक्रमक आंदोलन करून सरकारला धारेवर धरणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अशातच खळबळजनक माहिती समोर आलीय.

Manoj Jarange Murder Plan: धनंजय मुंडेंचं काय खरं नाय! मनोज जरांगेंची SP कार्यालायत धाव, 'त्या' 15 लोकांनी..
Manoj Jarange Murder Conspiracy
मुंबई:

लक्ष्मण सोळुंके, प्रतिनिधी

Manoj Jarange Patil Latest News : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आक्रमक आंदोलन करून सरकारला धारेवर धरणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. जरांगेंच्या हत्येचा कट कोणी शिजवला? याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. अशातच याप्रकरणावर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत खळबळजनक खुलासे केले आहेत. दुसरीकडे आमदार धनंजय मुंडे यांनीही जरांगेंवर निशाणा साधला होता. जरांगेंचनी नार्को टेस्ट करायला पाहिजे, असं मुंडे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता खुद्द मनोज जरांगे यांनी नार्को टेस्टसाठी जालनाच्या पोलीस अध्यक्षकांकडे अर्ज दाखल केला आहे. या अर्जाच्या माध्यमातून 10 ते 15 लोकांची नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मनोज जरागे पाटील यांच्या हत्याचा कट रचल्या प्रकरणी जालना पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या तक्रारी नंतर बीड मधून दोघांना अटक केली होती त्यावर जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत थेट या संपूर्ण कटाचा मुख सूत्रधार म्हणून धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप करत पोलिसांनी या मागे असलेल्या आरोपीना धरावे सोडावे आम्हाला काहीही देणं घेणं नाही.जालना बिड जिल्ह्यातील अनेक लोक इथे बसले होते. त्यामुळे खर काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे.मी खरी हकीकत मांडणार.बीडचा एक कार्यकर्ता पकडलेल्या दोन पैकी एका कडे गेला.त्या बीडच्या या कार्यकर्त्याने सोबत नेले.खोट्या रेकॉर्डिंग, खोटे व्हिडीओ बनवणे यासाठी त्यांची तयारी सुरू होती अस त्या नंतर माझा खून करायचं ठरलं.आणखी पुढे नंतर मला औषध देऊन कार्यक्रम करायचं ठरलं होतं असा थेट आरोप त्यांनी केला. 

बीडचा कांचन नावाचा कार्यकर्ता मुंडेंचा पीए, नेमकं काय घडलं?

बीडचा कांचन नावाचा कार्यकर्ता धनंजय मुंडे यांचा पीए आहे.त्याने या आरोपीना सोबत घेऊन परळी येथील रेस्ट हाऊसला नेलं.तिथे पकडलेल्या एका पैकी माझ्याकडे भरपूर आहे असं सांगत दोन कोटी त्यांना द्यायचे ठरले.धनंजय मुंडे यांनी यांना करायचं सांगितलं आहे असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला संभाजीनगरच्या झालटा फाटा येथे धंनंजय मुंडे या आरोपींची एक तास वाट पाहत राहिले.आणि आरोपींना गोळ्या पुरवण्याचं आश्वासन धनंजय मुंडे ने दिलं या संपूर्ण कटात खूप जण आहे अंतर वालीच्या परीसरातील बडे नावाची व्यक्ती देखील आहे.

नक्की वाचा >> Viral Video दूध, आंघोळ अन् बरंच काही...कुटुंबीयांनी मुलीच्या पहिल्या मासिक पाळीचं केलं भन्नाट सेलिब्रेशन!

यात एकूण 10 ते 11 जण असल्याच देखील जरांगे पाटील यांनी म्हंटल होत.आरोपी धांनजय मंडेला म्हणाले तुम्ही आम्हाला गाडी घेऊन द्या आम्ही गाडीने अपघात घडवतो.यावर धनंजय मुंडे म्हणाले जुनी गाडी घेऊन देतो?यातील मूळ धनंजय मुंडे आहेत बिडच्या नेत्यांच्या प्रत्येक गाडीत गाडीच्या शीटखाली मोबाईल असून रेकॉर्डिंग केली जाते.त्यामुळे ही नासकी टोळी संपवा.त्यांनी अनेक ठिकाणी कॅमेरे बसवलेले आहेत.आरोपींकडे पंकजा मुंडे बद्दल देखील खूप काही आहे.धस यांच्या बद्दल देखील खूप काही आहे.असे आरोप देखील त्यांनी जरांगे पाटील यांनी केले होते.

त्यांच्याच लोकांचा हा डाव आहे?

जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषदेनंतर लगेच धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत जरांगे पाटील यांनी केलेल्या केलेल्या आरोपावर उत्तर देताना मराठा सामाजाच्या मागण्यासाठी मी रक्त जाळल, मी ओबीसी आंदोलनाच्या व्यासपीठावर गेल्याने आणि त्यांना गोगल दिला नसल्याने त्यांनी आता हे आरोप करायला सुरवत केलीय. त्यांच्याच लोकांचा हा डाव आहे.त्यांनीच लोक पाठवले कुणी भेटायला आलं तर त्याचे फोटो काढावेच लागतात अस म्हणत धनंजय मुंडे यांनी ब्रेन मॅपिंग सीबीआय चौकशी, नार्को टेस्ट करा मी तयार आहे, त्याचा खर्च मी देतो असं म्हणत मनोज जरांगे यांना आव्हान दिल होतं.

नक्की वाचा >> बसमध्ये महिलेच्या गुप्तांगाला गुपचूप स्पर्श केला..महिलेनं व्हिडीओ काढून वासनांधाच्या कानाखाली जाळ काढला अन्..

धनंजय मुंडे यांच्या या आव्हान नंतर मनोज जरांगे पाटील यांनी लगेच पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांनी ब्रेन मॅपिंग सीबीआय चौकशी वर बोलताना हा साधा सुधा आणि चेष्टेवर न्यायचा विषय नाही.ही वेळ कुणावर देखील येऊ शकते.ही परिस्थिती मर्यादेच्या पलीकडे त्याने नेली आहे.मला अमुक अमुक माहिती मिळाली आणि मी ती पोलिसांना दिली. धंनंजय मुंडे आणि 8 ते 10 जण त्यात आहे.तो नार्को टेस्ट म्हणतो ना मी सगळ्यात आधी उद्या एसपी कलेक्टर,कोर्टात गृहमंत्रालयाकडे अर्ज करणार.

नार्को टेस्ट साठी सगळ्यात आधी माझा अर्ज राहील. अस म्हणत धनंजय मुंडे यांचं आव्हान स्वीकारतात पोलीस अधीक्षक जालना यांना नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करण्याचा अर्ज दिलाय या अर्जात त्यांनी एकट्याची नाही तर धनंजय मुंडे यांच्या सह त्या कटातील दहा ते 12 जनाची ही चौकशी करण्याची नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करण्याची मागणी केलीय, यात कुण्या एकट्या व्यक्तीची नाही तर कटातील सर्वांची टेस्ट करावी मी ही टेस्ट करायला तयार असल्याच म्हंटल आहे. आता जरांगे पाटील यांच्या अर्जावरून पोलिस अधीक्षक काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com