जाहिरात

Manoj Jarange Patil: "राज ठाकरे कुचक्या कानाचे, फडणवीसांनी गेम केला तरीही..", मनोज जरांगेंचे टीकास्त्र

Manoj Jarange Patil Mumbai Morcha: कोणाला बोलतोय हे त्याला कळतंय. लोकसभेत सुद्धा तू लोकांकडून पैसे घेतले. तु रेनकोट वाटले आणि कोणाकडून पैसे घेतले हे माहित आहे," असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil: "राज ठाकरे कुचक्या कानाचे, फडणवीसांनी गेम केला तरीही..", मनोज जरांगेंचे टीकास्त्र

Manoj Jarange Patil Mumbai Morcha:  मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून परतणार नाही, असा निर्धार व्यक्त करत उद्यापासून पाणी पिणेही बंद करणार आहे अशी मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचे संकेत दिले आहेत. 

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

"जेवण घेऊन कोणी मुंबईत येत असाल तर जिथे पार्किंग आहे तिथे वाटप करत राहा. ज्यांनी अन्नछत्र सुरु केले त्यातून पैसे मागू नका. मग मी डायरेक्ट मिडियामध्ये नाव घेईल. महाराष्ट्रातील मराठ्यांनी कोणालाही पैसे द्यायचे नाहीत. मी कोणाला बोलतोय हे त्याला कळतंय. लोकसभेत सुद्धा तू लोकांकडून पैसे घेतले. तु रेनकोट वाटले आणि कोणाकडून पैसे घेतले हे माहित आहे," असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil Maratha Morcha : मराठा आंदोलनादरम्यान हळहळ! आणखी एका मराठा बांधवाचा मृत्यू

 तसेच "उद्यापासून पाणी पण बंद करणार आहे. कडक उपोषण करणार आहे.  यांना कितीही अन्याय अत्याचार करू द्या आपण शांत राहायचं. काहीही करून तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय मी मुंबई सोडणार नाही. काल मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक झाली. तातडीने मार्ग काढण्याचे आदेश दिले तर ही का काढत नाहीत?" असा सवालही मनोज जरांग पाटील यांनी उपस्थित केला आहे.

"समाजाच म्हणणं आहे दोन भाऊ चांगले आहेत ब्रँड चांगले आहेत. पण विनाकारण का या विषयात नाक खुपसता? विधानसभा लोकसभा दोन्हीकडे गेम केला तरी तुम्ही फडणवीसांचे गुणगान गातात का? त्यांच्या घरात फडणवीस चहा पिऊन गेला की हा बदलला. आमच्या गावाकडे त्याला कुजक्या कानाचा म्हणतात," असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांंच्यावर निशाणा साधला.

"चंद्रकांत दादा पाटील यांना म्हणाव चांगला काम केलं पण मराठ्यांच्या शिव्या खाऊ नको. वचवच करू नको. चंद्रकांत पाटील याला काय अक्कल आहे का चंद्रकांत दादा याने जपून वागावे नाहीतर महाराष्ट्र सोडून दिल्लीत राहायला जावं लागेल.तो जात काही वेगळं बोललं तर त्याचा गेमच वाजवेन. ओबीसी मधून आरक्षण हवं बस!" असं म्हणत जरांगे पाटील यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचाही समाचार घेतला. 

नक्की वाचा - Manoj Jarange : जरांगे पाटलांकडून नवं 'चॅलेंज'; सातारा-हैदराबाद गॅझेटच्या अभ्यासकांना आझाद मैदानावर बोलावले

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com