आपण कितीही आंदोलनं केली. किती लढलो. कितीही कोटीच्या संख्येने एकत्र आलो. तरी आपल्याच छातीवर बसून, नाकावर टिच्चून सरकारने कोणता निर्णय घेतला. तर तुम्हाला आरक्षण देत नाही. ही खुन्नस आपल्याला दिली आहे. त्यामुळे यांना आता फेकून द्यावचं लागणार. आता सुट्टी नाही. अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दम भरला आहे. नारायण गडावर आयोजित मराठा समाजाच्या दसरा मेळाव्यात ते उपस्थित जनसमुदाया समोर बोलत होते. यावेळी नारायण गडावर प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी जरांगे यांनी सरकारला थेट आव्हान देत अचारसंहीता लागेपर्यंत आपण वाट पाहाणार आहोत. काही बोलणार नाही. पण ज्यावेळी अचारसंहीता लागेल त्यावेळी मात्र आपली भूमीका जाहीर करू असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. शिवाय त्यावेळी आपण सांगू ते समाज ऐकाल असे वचनही त्यांनी समाजाकडून घेतले. त्यावेळी सर्वांनी हात वर करून जरांगे यांना वचन दिले. त्यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मराठा समजाचं काय चुकलं?
नारायण गडावरून बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला काही प्रश्न केले. त्यात ते म्हणाले मराठा समाजाचे काय चुकले आहे. मराठा समाजाने कधीही जातीयवाद केला नाही. हा समाज अन्याया विरूद्ध लढला आहे. अन्याय झाला म्हणून दिल्लीही याच समाजानं वाकवलं आहे. आता समाज पुन्हा एकत्र आला आहे. तो अन्याया विरुद्ध लढणार आहे. अन्याया विरोधात उठाव करावा लागतो. आपला नाईलाज आहे. जर आपली अडवणूक होणार असेल तर मायबापानो तुम्हालाही उठाव करावाच लागणार आहे असे ते म्हणाले. का आमच्या वाट्याला अन्याय आला आहे. असं आम्ही काय पाप केलं. आमच्या वाट्याला फक्त आणि फक्त अन्याय आलाय. माझा समाज या राज्यातल्या जनतेसाठी झिजलाय. स्वता या समाजाने दुसऱ्यासाठी झिज केलीय. मग आमचं नेमकं चुकलं कुठं. आम्ही नेमक केलंय काय. कोणी तरी आम्हाला सांगा आमची चुक काय. आमचे दारिद्र कमी व्हावं म्हणून आम्ही संघर्ष केलाय असे ते यावेळी म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - 'शस्त्र बाहेर काढा, क्रांती करा, वचपा काढा' सर्वांच्या मेळाव्या आधी 'राज' गर्जना
गरिब मराठ्यांसाठी गरीब मराठ्याचा मुलगा मैदानात
मनोज जरांगे यावेळी भावनिक झाले होते. मराठा समाज हा देश आणि राज्य पुढे जावं म्हणून झिजला आहे. हातात तलवारी घेतल्या. माना आमच्या कपल्या, पण न्याय तुम्हाला दिला. रक्त आमचं सांडलं. अन्यायाचा विनाश आम्ही केला. अत्याचाऱ्यांचे अड्डे आम्ही उद्धवस्त केले. मग आमच्यावर अन्याय काय? असा प्रश्नही त्यांनी या निमित्ताने केला. असं असताना मराठा समाजाच्या डोळ्यात येणारं पाणी पाहवत नाही. या विजया दशमीच्या मुहुर्तावर सांगतो. मी जिवंत असे पर्यंत तुमच्या डोळ्यात पाणी येवू देणार नाही. कोणी झागिरदारायची आवलाद येवू द्या. पण त्याच्या पुढे झुकायचं नाही असंही त्यांनी सरकारला ठणकावलं. समाजावर अन्याय होणार असेल तर स्वसंरक्षण करावेच लागेल, असे ही त्यांनी समाजाला यावेळी सांगितले. गरिब मराठ्यांच्या मुलासाठी एका गरीब मराठ्याचा मुलगा उभा राहीला आहे असेही ते म्हणाले.
'माझ्या विरुद्ध षडयंत्र रचलं जातयं'
आपल्या विरुद्ध षडयंत्र रचलं जात आहे. आपल्याला टार्गेट केलं जात आहे. आता ही गर्दी पाहून त्यांचे डोळे उघडले असतील. त्यांनी आपल्याला टार्गेट केले की संपलं. जर न्याय मिळवायचा असेल तर यावेळी आपल्याला उलथापालथ करावीच लागणार आहे. त्या शिवाय पर्याय काय आहे असेही ते म्हणाले. आपल्या नाकावर टिच्चून जर कोणते निर्णय घेणार असतील. समाजावर अन्याय होणार असेल तर त्यांना आपल्याला गाडावच लागणार आहे. असे सांगत सरकारवरील रोष त्यांनी व्यक्त केला. शिवाय सरकारला यातून इशाराही त्यांनी दिला. समाज महत्वाचा आहे. शेतकरी महत्वाचा आहे. त्यात मला संपवण्यासाठी षडयंत्र रचले गेले. मला पुर्ण घेरलं आहे. खोटं बोलणार नाही. पण मला सांगावं लागत आहे. माझा नाईलाज आहे. मला सांगायचं नाही. मला होणाऱ्या वेदना समाज सहन होत नाही. मला ही समाजाला होणारा त्रास सहन होत नाही. पण आता एक घाव दोन तुकडे करण्याची वेळ आली आहे असेही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - बांगलादेश ते मणिपूर, विजयादशमी निमित्त मोहन भागवत प्रत्येक गोष्टीवर बोलले
'मला एक वचन द्या, मी सांगेन ते...'
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी समाजाकडून एक वचन घेतलं. आपण आचारसंहीता लागण्याची वाट पाहू. तोपर्यंत सरकारने आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा. जर निर्णय घेतला नाहीतर त्यांना मराठा काय असतो ते दाखवून देईल. त्यासाठी तुम्ही एक वचन द्या. मी जे सांगेन ते तुम्ही कराल. फक्त हट्ट धरू नका. मी तुमच्या शब्दाच्या पुढे कधीच जाणार नाही. तुम्हाला सोडून जाणार नाही. असे जरांगे यावेळी सांगितले. शिवाय जर कोणी समाजावर अन्याय करत असेल तर त्याला गाडल्या शिवाय राहाणार नाही असेही ते म्हणाले. मराठा समाज सर्व सहन करत आहे. पणनंतर सर्वांचा कार्यक्रम लावल्या शिवाय राहाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. आम्ही क्षत्रिय मराठे आहोत, आम्ही कधीच गप्प बसत नाही. सरकारने आम्हाला फसवलं आहे. 14 महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. त्यात आपल्या डोळ्या देखत अन्याय करणार असतील तर या सरकारला उखडून फेकावं लागणार. इथं नाईलाज आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
ट्रेंडिंग बातमी - राणा पती-पत्नीत जागा वाटपावरून मतभेद? रवी राणांच्या जागांवर नवनीत यांचा डोळा
सरकारने फसवले, आता त्यांच्याकडून लिहून घेणार का?
मराठा आरक्षणसासाठी 14 महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. ओबीसी म्हणतात आमच्यात आलात तर आमच्यावर अन्याय होईल. आमचं आरक्षण कमी होईल. पण त्याच ओबीसीमध्ये आता 17 जाती घुसवण्यात आल्या आहेत. आता माझ्या त्यांना प्रश्न आहे, ज्यांनी मला महाविकास आघाडीकडून लेखी घ्यायला सांगितलं होतं, की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. आता हे विचारणाऱ्यांना मी विचारतो या 17 जाती ओबीसीत आल्याने ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हे तुम्ही महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं होतं का? असा हल्लाबोलच त्यांनी सरकारवर केला. दरम्यान पक्ष पक्ष नेतानेता करून नका. समाजाला कलंक लागेल असे काही करू नका. सरकार काय करतात ते पाहायचं. त्यानंतर निर्णय घ्यायचा. त्यांचे गणित उचकावयाचं. तुमच्या मनात जे आहे. तुमची इच्छी आहे ती पुर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. तुमची इच्छा. तुमची शान, तुमची लेकरं सुखी करण्याची जाबाबदारी माझी आहे. फक्त मागे हटायचं नाही. असेही जरांगे यावेळी म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world