जाहिरात

बांगलादेश ते मणिपूर, विजयादशमी निमित्त मोहन भागवत प्रत्येक गोष्टीवर बोलले

रेशीम बागेत विजयादशमी आणि शस्त्र पुजनाचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मणिपूर पासून ते अगदी बांगलादेशपर्यंत आपले मत व्यक्त केले.

बांगलादेश ते मणिपूर, विजयादशमी निमित्त मोहन भागवत प्रत्येक गोष्टीवर बोलले
नागपूर:

राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाने नागपूरच्या रेशीम बागेत विजयादशमी आणि शस्त्र पुजनाचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मणिपूर पासून ते अगदी बांगलादेशपर्यंत आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी दुर्बल रहाणे हा अपराध आहे, असे सांगितले. बांगलादेशमध्ये हिंदूवर सध्या हल्ले होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. जात, धर्म, प्रांत, भाषा या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. कट्टरवादाला चिथावणी देणाऱ्या घटकांमध्ये वाढ झाल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.  

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बांगलादेशमध्ये सध्या गोंधळाचे वातावरण आहे. त्यात हिंदूवर हल्ले होत आहेत. या पार्श्वभूमीवर भागवत म्हणाले दुर्बल राहाणे हा अपराध आहे. हिंदू समाजाला हे समजले पाहीजे. सर्वांना संघटीत राहाणे गरजेचे आहे. तुम्ही संघटीत असाल तर तुम्ही लढू शकता. जर तुम्ही संघटीत नसाल तर तुमच्या अडचणी निश्चित वाढतील असेही ते यावेळी म्हणाले. त्यामुळे हिंदूनी संघटीत रहावे असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला. 

ट्रेंडिंग बातमी - 'शस्त्र बाहेर काढा, क्रांती करा, वचपा काढा' सर्वांच्या मेळाव्या आधी 'राज' गर्जना

भारत प्रगती करत आहे. जगाच्या स्पर्धेतही पुढे जात आहे. पण जेव्हा एखादा देश प्रगती करत असतो. पुढे जात असतो, त्यावेळी त्याचे पाय ओढण्याचे काम काही जण करत असतात. त्यामुळेच दुसऱ्या देशातील सरकार हे कमजोर केले जाते. हे जगभरात सध्या सुरू आहे. आपल्या शेजारील बांगलादेशमध्ये काय झालं हे आपण सर्वांनी पाहीलं असेही भागवत यावेळी म्हणाले. बांगलादेश मध्ये जी स्थिती निर्माण झाली त्यावेळी हिंदूवर हल्ले झाले. तिथे कट्टरपंथीय मानसिकता जोपर्यंत आहे तो पर्यंत तिथला हिंदूच नाही तर अन्य अल्पसंख्यांक ही धोक्यात आहेत असे भागवत म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - मुंडे- जरांगेंच्या दसरा मेळाव्याने वातावरण तापणार? गर्दीचा उच्चांक कोण मोडणार?

शिवाय बांगलादेशात काही गोष्टींच्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यात भारतापासून बांगलादेशला धोका आहे असे सांगितले जात आहे. जस सामाजिक सद्भावना राखायची असेल तर प्रत्येकाने जाती आणि धर्माच्या पुढे जावून विचार करणे गरजेचे आहे. प्रत्येकामध्ये मैत्रीचे संबध असण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. शिवाय गेल्या काही वर्षात भारत ताकदवान झाला आहे असं सर्वांचं म्हणणं आहे. शिवाय जगातही भारताची पत वाढली आहे असे ते म्हणाले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: