जाहिरात

Assembly Election Candidate : नाव एक, उमेदवार अनेक; मतदारांमध्ये गोंधळ!

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्यानंतर अनेक मतदारसंघांमध्ये एकाच नावाचे अनेक उमेदवार दिसून येत आहेत.

Assembly Election Candidate : नाव एक, उमेदवार अनेक; मतदारांमध्ये गोंधळ!
मुंबई:

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्यानंतर अनेक मतदारसंघांमध्ये एकाच नावाचे अनेक उमेदवार दिसून येत आहेत. मोठ्या पक्षांच्या नेत्यांच्या नावाशी साधर्म्य असलेली नावं असल्याने मतदारांमध्ये गोंधळ वाढण्याची शक्यता आहे. 

जाणून घेऊया कोणत्या मतदारसंघात एकाच नावाचे अनेक उमेदवार

कल्याण पूर्व विधानसभेत एकाच नावाचे दोन उमेदवार
शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश दशरथ गायकवाड यांनी अपक्ष उमेदवारी भरला आहे. महेश गायकवाड यांनी भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे.तर त्याच्या नावाशी साधर्म्य असलेले दुसरे महेश प्रकाश गायकवाड यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे

औरंगाबाद
सिल्लोड विधानसभा मतदारसंघ
सुरेश बनकर (उद्धव ठाकरे गट)
सुरेश बनकर (अपक्ष)

औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ
राजू शिंदे (उद्धव ठाकरे गट)
राजू शिंदे (अपक्ष)


नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदार संघात आणखी एक अनिल देशमुख 
नागपूर जिल्ह्यातील काटोल हा माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांचा 1995 पासूनचा मतदारसंघ असून यावेळी मात्र ते  निवडणूक रिंगणात नाहीत. त्यांच्या ऐवजी त्यांचा मुलगा सलील देशमुख शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवार आहे. असे असले तरी काटोल मतदारसंघांत आणखी एका अनिल देशमुख यांनी नामांकन अर्ज दाखल केला आहे. माजी गृहमंत्री अनिल वसंतराव देशमुख यांच्या नावाप्रमाणे नाव असलेले अनिल शंकरराव देशमुख हे नरखेड तालुक्यातील थुगाव (निपाणी) येथील रहिवासी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)कडून हा नामांकन अर्ज भरण्यात आला आहे. तो मान्यही झाला आहे. काटोल येथून भाजपकडून चरण सिंग ठाकूर यांना भाजपची उमेदवारी मिळाली आहे, असे असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गटाकडून अनिल देशमुखांच्या नावाशी साधर्म असलेल्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात आल्याने सगळ्यांचे लक्ष या मतदारसंघाकडे लागलं आहे.

अमरावती तिवसा विधानसभेत भाजपच्या राजेश वानखडेविरुद्ध आणखीन दोन राजेश वानखडे निवडणूक मैदानात..
अमरावतीच्या तिवसा विधानसभेत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर विरुद्ध भाजपचे राजेश वानखडे यांच्यात थेट लढत होणार आहे. ही स्थिती असतानाच दोन अपक्ष असलेल्या राजेश वानखडे नावाच्या उमेदवारांनी देखील आपलं नामांकन दाखल केलं आहे. त्यामुळे भाजपचे अधिकृत उमेदवार राजेश वानखडे यांची चांगलीच डोकेदुखी वाढणार असल्याचे चित्र पाहायला मिळतेय.

काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, विद्यमान आमदाराचा शिंदे गटात प्रवेश

नक्की वाचा - काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, विद्यमान आमदाराचा शिंदे गटात प्रवेश

राजेश श्रीराम वानखडे - भाजप 
राजेश बळीराम वानखडे - अपक्ष 
राजेश रामदास वानखडे - अपक्ष

अशा तीन एकाच नावाच्या उमेदवारांनी तिवसा विधानसभेतून नामांकन अर्ज दाखल केलाय. त्यामुळे मातांचे विभाजन होऊन भाजपच्या राजेश वानखडे यांना त्याचा निवडणुकीत फटका बसण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 

सांगली : दोन मतदारसंघात एकाच नावाचे अनेक उमेदवार... 
सांगली आणि तासगाव कवठेमंकाळ या दोन मतदार संघात एकापेक्षा जास्त एक सारख्या नावाचे अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला मात देण्यासाठी ही शक्कल लढवल्याचे चर्चा रंगली आहे. सांगली जिल्ह्यातील दोन मतदारसंघात एकसारख्या नावाचे अनेक उमेदवार उभे राहिल्याचे दिसून आले आहे. सांगलीमध्ये दिवंगत काँग्रेस नेते माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील या अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या नावाचे दोन उमेदवार उभे आहेत. तर तासगाव कवठेमहाकाळ मतदारसंघात माजी गृहमंत्री दिवंगत नेते आर आर आबा पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधानसभा उमेदवार आहेत. रोहित पाटील या नावाने आणखीन तीन उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. विधानसभा निवडणुकीत रणनीती करून मतांचे विभाजन होऊन प्रमुख उमेदवाराला याचा फटका बसावा म्हणून अशी शक्कल लढवली जात आहे. पण विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांना आपला उमेदवार ओळखण्यासाठी उमेदवारांच्या नावासमोर फोटोही लावण्यात आले आहे.

अहिल्यानगर
कर्जत जामखेड मतदार संघामध्ये नावांमध्ये साम्य असलेले सहा उमेदवार 
१)राम शंकर शिंदे भाजप         
२)राम प्रभु शिंदे अपक्ष
३)राम नारायण शिंदे अपक्ष

४) रोहित राजेंद्र पवार (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष)
५) रोहित चंद्रकांत पवार  (अपक्ष)
६) रोहित सुरेश पवार      (अपक्ष)

'किती दिवस बाहेर राहणार, अखेर...'; तिकीट कापल्यामुळे अज्ञातवासात गेलेले वनगा अखेर घरी परतले

नक्की वाचा - 'किती दिवस बाहेर राहणार, अखेर...'; तिकीट कापल्यामुळे अज्ञातवासात गेलेले वनगा अखेर घरी परतले


हिंगोली 
कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या संतोष टारफे यांच्या विरुद्ध आणखीन दोन संतोष टार्फे मैदानात..
हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या संतोष टारफे यांच्या विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. संतोष विरुद्ध संतोष अशी लढत असणाऱ्या या मतदारसंघात आणखीन दोन संतोष टार्फे नावाच्या उमेदवाराने देखील अपक्ष म्हणून नामांकन अर्ज दाखल केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधुन शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार संतोष टारफे यांची चांगली डोकेदुखी वाढणार असल्याचं दिसून येत आहे. 
संतोष कौतिका टारफे (शिवसेना ठाकरे गट अधिकृत उमेदवार) 

टार्फे संतोष लक्ष्मण (अपक्ष )
टार्फे संतोष अंबादास (अपक्ष )

अशा एकाच नावाच्या तीन उमेदवारांनी कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून नामांकन अर्ज दाखल केल्यामुळे मताचे विभाजन होऊन शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार संतोष टारफे यांना या विधानसभा निवडणुकीमध्ये फटका बसण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

इंदापूर विधानसभेत हर्षवर्धन पाटील नावाने तिघांनी दाखल केली उमेदवारी, तर दत्तात्रय भरणे नावाने दोघांची उमेदवारी
इंदापूर विधानसभा 200 मतदारसंघांमध्ये हर्षवर्धन पाटील या नावाने तब्बल तिघांनी उमेदवारी दाखल केली आहे. यामध्ये हर्षवर्धन शहाजीराव पाटील (रा.बावडा ता.इंदापूर जि.पुणे) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून उमेदवारी दाखल केलीय. तर हर्षवर्धन गोपाळराव पाटील (रा.एकशिव ता.माळशिरस जि.सोलापूर ) आणि हर्षवर्धन श्रीपती पाटील (रा.निमगांव केतकी ता.इंदापूर जि.पुणे) या दोघांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.
यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसकडून दत्तात्रय विठोबा भरणे (रा.भरणेवाडी ता.इंदापूर जि.पुणे) हे मैदानात आहेत. तर दत्तात्रय सोनबा भरणे (रा.विठ्ठलवाडी ता.शिरुर जि.पुणे) यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. म्हणजे इंदापूर विधानसभेत दत्तात्रय भरणे या नावाने दोघांनी उमेदवारी दाखल केली आहे.

गंगाखेडमध्ये 3 उमेदवारांचे मिळते-जुळते नाव!
गंगाखेड विधानसभामध्ये विशाल कदम हे शिवसेना (उबाठा गटाचे) प्रमुख उमेदवार असून त्यांची थेट लढत रासपचे प्रमुख उमेदवार रत्नाकर गुट्टे यांच्याशी होणार आहे. तर आणखीन दोन विशाल कदम नावाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे हे दोघेही अपक्ष उमेदवार आहेत. यातील एक उमेदवार हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातून येतो. तर दुसरा उमेदवार नांदेडच्या हादगाव तालुक्यामधून येतो. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याचा मतदान आकड्यांवर किती परिणाम होईल हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com