मराठा-ओबीसी आंदोलक आमने-सामने; जोरदार घोषणाबाजी, वडीगोद्रीत तणावाची स्थिती

मराठा आंदोलकांची घोषणाबाजी सुरु होताच हाके यांच्या उपोषणातील संतप्त आंदोलकांनी देखील घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यामुळे दोन्ही गट आमने-सामने आले. या प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

Advertisement
Read Time: 2 mins

लक्ष्मण सोळुंके, जालना

जालन्यात मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने-सामने आल्याची प्रकार समोर आला आहे. मराठा-ओबीसी आंदोलक आमने-सामने आल्याने वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांच्या उपोषणा स्थळासमोर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. ओबीसी -मराठा आंदोलकांनी दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांच्या चुकीमुळे मराठा ओबीसी आंदोलक समोरा-समोर आरोप केला जात आहे. 

पोलिसांनी अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांना बॅरिकेटस लावून अडवल्यानं मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. नेमका हाके यांच्या उपोषणासमोरच हा प्रकार घडला. त्यामुळे मराठा आंदोलकांची घोषणाबाजी सुरु होताच हाके यांच्या उपोषणातील संतप्त आंदोलकांनी देखील घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यामुळे दोन्ही गट आमने-सामने आले. या प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी बंदोबस्त वाढवून मध्यस्थी करत हा वाद मिटवला. 

(नक्की वाचा-  Manoj Jarange : मनोज जरांगे यांची तब्येत खालावली; आज बीड आणि धाराशिव बंदची हाक)

मनोज जरांगे यांचा संताप

मराठा आंदोलकांना अंतरवाली सराटी येथे येताना पोलिसांनी अडवल्याच्या प्रकाराबद्दल मनोज जरांगे यांनी संताप व्यक्त केला. मराठ्यांना अडवून शिविगाळ करणाऱ्या पोलिसाला निलंबित करण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. वडीगोद्रीतून येताना शांत या, धनगर समाजासोबत आपल्याला कायम एकत्र राहायचं आहे. भांडण करू नका,तेथे घोषणाबाजी करू नका, असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. 

(नक्की वाचा: जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मविआ घेणार बाहेरची मदत, बैठकीत नेमकं काय ठरलं?)

मराठ्यांना वडीगोद्रीत अडवाल तर गेट उचलून फेकून देईन. अडवणाऱ्या पोलिसाला आउट करून टाकीन. एकाही मराठ्याला अडवायचं नाही,आम्ही आमचं बघून घेऊ. इकडे बसून गोरगरिबांच्या मारामाऱ्या लावायच्या आहेत का? अशी टीका देखील मनोज जरांगे यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर केली.