जाहिरात

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना हायकोर्टाचा दणका! आझाद मैदानावरील उपोषणास मनाई

मात्र जरांगेंच्या या आंदोलनाला हायकोर्टाने दणका दिला असून आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी नाकारली आहे. 

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना हायकोर्टाचा दणका! आझाद मैदानावरील उपोषणास मनाई

Manoj Jarange Patil Protest Mumbai:  एकीकडे राज्यात गणपती उत्सवाची जय्यत तयारी सुरु असतानाच मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा आरक्षणाचे वादळ मुंबईमध्ये धडकणार आहे. ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल होणार असून ते आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. मात्र जरांगेंच्या या आंदोलनाला हायकोर्टाने दणका दिला असून आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनाई केली आहे. 

मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना परवानगीशिवाय आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनासई केली आहे. परवानगी घेतल्याशिवाय आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही. त्यांना निदर्शने करण्यासाठी खारघर किंवा नवी मुंबईमध्ये पर्यायी जागा उपलब्ध करुन द्या. असे कोर्टाने म्हटले आहे. शहरातील रहदारी विस्कळीत होऊ नये, यादृष्टीने मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये, असंही निर्देश न्यायालयाने म्हटले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com