
Marathwada Rain : मागील 24 तासांपासून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे या भागातील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह इतरही काही भागांत ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने स्थानिक नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे, मराठवाड्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठा
मराठवाडा विभागातील 11 मोठ्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा वाढून तो 86.01 टक्क्यांवर पोहोचला आहे. ही आकडेवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच चांगली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हाच पाणीसाठा केवळ 33.87 टक्के होता.
(नक्की वाचा- Mumbai Rain: मुंबई, ठाणे, नवी मुंबईत तुफान पाऊस! सखल भागात पाणी साचलं, वाहतूक सेवा, लोकलची स्थिती काय?)
धरणांमधील सध्याचा पाणीसाठा
- जायकवाडी: -92.90 टक्के
- निम्न दुधना - 65.36 टक्के
- येलदरी - 94.08 टक्के
- सिद्धेश्वर - 86.60 टक्के
- माजलगाव - 36.06 टक्के
- मांजरा - 79.60 टक्के
- पैनगंगा (ईसापूर) - 95.46 टक्के
- मनार - 78.27 टक्के
- निम्न तेरणा - 95.40 टक्के
- विष्णुपुरी - 73.31 टक्के
- सीना कोळेगाव - 78.89 टक्के
(नक्की वाचा- Maharashtra Rains: मुंबई, रायगडला अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट; गरज असेल तरच घराबाहेर पडा, BMC चं आवाहन)
या आकडेवारीनुसार, मराठवाड्यातील पैनगंगा, निम्न तेरणा आणि येलदरी या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा ९० टक्क्यांहून अधिक आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठाही 92.90 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे, ज्यामुळे मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world