Nanded News : मटका किंगचा राष्ट्रवादीत प्रवेश; आमदार चिखलीकरांकडून अजित पवारांच्या आदेशाला केराची टोपली

Nanded News : अन्वर अली खान हा मटका किंग असून शिवाय त्याच्यावर मारहाण, बळजबरी जमिनीवर कब्जा करणे, बेकादेशीर शस्त्र बागळणे, हवेत गोळीबार, बायो डीझेल विकल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

योगेश लाटकर, नांदेड

Nanded News : राष्ट्रवादी काँगेस पक्षात प्रवेश देताना चारित्र्य तपासा, गुंड आणि दोन नंबदचे धंदे करणाऱ्यांना पक्षात प्रवेश देऊ नका, अशी तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिली होती. पक्ष प्रवेश कुणाला द्यावा यावर अजित पवार यांनी परभणी येथील कार्यक्रमात सविस्तर भाष्य केलं होतं. मात्र नांदेडमध्ये अजित पवारांच्या आदेशाला आमदार प्रताप पाटील चिखलीकरांकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे. 

(नक्की वाचा-  Pune News : सुनेची आत्महत्या, छळ केल्याचा आरोप; राष्ट्रवादीच्या नेत्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल)

नांदेडमध्ये गुंड आणि दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांना राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश देण्यात आला आहे. नांदेड शहरातील मटका किंग, गुंड अन्वर अली खान याने काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी गुंड अनवर अली खान याला स्वतःच्या निवासस्थानी बोलावून पक्षात प्रवेश दिला आहे.  

अन्वर अली खान हा मटका किंग असून शिवाय त्याच्यावर मारहाण, बळजबरी जमिनीवर कब्जा करणे, बेकादेशीर शस्त्र बागळणे, हवेत गोळीबार, बायो डीझेल विकल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. 

(नक्की वाचा-  Joe Biden : अमेरिकेच माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सरची लागण, हाडांमध्ये पसरल्याने चिंता)

याशिवाय कुख्यात दहशतवादी हरविंदर सिंघ रींदा याने घडवलेल्या संजय बियाणी हत्या प्रकरणात देखील अन्वर अली खान याची संशयित म्हणून चौकशी करण्यात आली होती. सध्या राष्ट्रवादीचे प्रताप पाटील यांनी पक्षप्रवेशाचा धडाका लावला आहे. याच नादात कुणाला प्रवेश द्यावा कुणाला देऊ नये हे चिखलीकर विसरून गेलेले दिसत आहे.

Advertisement
Topics mentioned in this article