जाहिरात

MHADA Home : मुंबईतील म्हाडाचं घर पडलं 1.46 कोटींना; स्वस्त दराचं प्रलोभन पडलं महागात!

मुंबईत घर असावं हे अनेकांना स्वप्नवत वाटतं. मात्र म्हाडाच्या योजनांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मुंबईत परवडणारं घर घेणं शक्य होतं.

MHADA Home : मुंबईतील म्हाडाचं घर पडलं 1.46 कोटींना; स्वस्त दराचं प्रलोभन पडलं महागात!
मुंबईतील म्हाडाचं घर पडलं 1.46 कोटींना

MHADA Home Fraud : हक्काचं घर असावं अशी सर्वसाधारणपणे प्रत्येकाची इच्छा असतो. आपण हक्काच्या घराची स्वप्न पाहतो. त्यातही मुंबईत घर असावं हे अनेकांना स्वप्नवत वाटतं. मात्र म्हाडाच्या योजनांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मुंबईत परवडणारं घर घेणं शक्य होतं. दरम्यान एकाला म्हाडातील स्वस्तातलं घर तब्बल 1.46 कोटींना पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. म्हाडाचं घर स्वस्त दरात देण्याचं प्रलोभन दाखवून एका महिलेसह 8 जणांची फसवणूक करण्यात आली आहे. यामध्ये आरोपींनी पीडितांना तब्बल 1 कोटी 46 लाखांना चुना लावला आहे. 

हा प्रकार मालाडमधून समोर आला आहे. मालाड पश्चिमेला राहणाऱ्या एकाm महिलेने तिच्यासोबत फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, तिच्या पतीचा मित्र त्यांच्याच इमारतीत राहत होता. त्यांनी म्हाडाची स्वस्त घरं मिळविण्यासाठी राजू साटम नावाच्या व्यक्तीचं नाव सूचवलं. त्यानुसार पीडित दाम्पत्याने 26 मार्चला अशोक इंगोलेंची अशोका शॉपिंग सेंटरमध्ये भेट घेतली. येथे इंगोलेने त्यांना विश्वास घेतलं. मी साटम आणि किरण बोडके आम्ही पार्टनर असून म्हाडाचे फ्लॅट स्वस्त दरात विकत असल्याचं सांगितलं. 

Malegaon News: मदत मागायला गेली अन् वासनेची शिकार झाली! MIM नेत्याचे भयंकर कृत्य, अखेर...

नक्की वाचा - Malegaon News: मदत मागायला गेली अन् वासनेची शिकार झाली! MIM नेत्याचे भयंकर कृत्य, अखेर...

यासाठी त्यांनी गोरेगाव पश्चिमेकडील पहाडी परिसरातील एक म्हाडाचा फ्लॅट दाखवला. हा फ्लॅट 47 लाखांना विकायचं असल्याचं सांगितलं. पीडित दाम्पत्याने आरोपीला टप्प्याटप्प्याने 34 लाख रुपये टप्प्याटप्प्याने दिले. मात्र पीडितेला फ्लॅटचा ताबा देण्यात आला नाही. अशाच प्रकारे सात जणांची फसवणूक झाल्याचं लक्षात येता पीडित दाम्पत्याने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणात किरण बोडके, अशोक इंगोले आणि तुषार साटम या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com