
देवा राखुंडे, इंदापूर:
Dattatray Bharne On Ladki Bahin Yojana: राज्य सरकारची गेमचेंजर स्कीम म्हणून ओळखली जाणारी लाडकी बहीण योजना नेहमीच चर्चेत असते. लाडकी बहीण योजनेसाठी अनेक खात्यांमधील निधी वळवले जातात, विविध खात्यांच्या पैशांवर डल्ला मारला जातो अशा तक्रारी वारंवार समोर येत असतात. काही दिवसांपूर्वीच सामाजिक विधी तसेच न्याय खात्याचा निधी लाडक्या बहीणसाठी दिल्याचा आरोप केला होता. अशातच आता अजित पवारांचेच (Ajit Pawar) विश्वासू शिलेदार मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठे विधान केले आहे.
काय म्हणालेत दत्तात्रय भरणे?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे (Datta Bharne) यांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे निधी यायला उशीर होतोय, असा दावा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला आहे. इंदापूरमध्ये अपूर्ण घरकूल लाभार्थी मेळावा व पहिला हप्ता वितरण कार्यक्रमामध्ये त्यांनी याबाबत विधान केले.
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला आणखी एक चाळणी; 'या' महिलांना मिळणार नाही लाभ
"मी माझ्या तालुक्यातील नागरिकाचा फायदा कसा होईल ते बघतो. मी मुंबई पुण्यामध्ये कुठेही असूद्या इंदापूर तालुक्यामध्ये सर्वात जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र लाडक्या बहिणीमुळे निधी यायला थोडा उशीर होतोय, थोडा उशीर झाला पण गाडी हळूहळू रुळावरती यायला लागली आहे," असं मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. एकीकडे विरोधक लाडकी बहीण योजनेवरुन सरकारवर निशाणा साधत असतानाच महायुतीच्या मंत्र्यांनीच याबाबत कबुली दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान, दत्तात्रय भरणे यांच्या या विधानावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मी त्याला विचारतो. तो माझा सहकारी आहे, मंत्रिमंडळात आहे. नेमका कुठला निधी मिळाला नाही? आणि कुठल्या अर्थानं ते बोलले हे त्यांना विचारून सांगतो, असं उपमुख्यमंंत्री अजित पवार म्हणालेत.
Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत की नाही? कुठे तपासाल?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world