जाहिरात

Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत की नाही? कुठे तपासाल?

राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्वीट करत मे महिन्याच्या निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती दिली होती. 4 जूनपासून लाडकी बहीण योजनेचा 11 हफ्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. 

Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत की नाही? कुठे तपासाल?

Ladki Bahin Yojna : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा 11 हफ्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिल्यांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा देखील झाले आहेत. जर  तुम्ही या योजनेच्या लाभार्थी असाल आणि तुम्हाला अद्याप पैसे मिळाले नसतील तर विविध मार्गांनी तुम्ही ते तपासू शकता. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्वीट करत मे महिन्याच्या निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती दिली होती. 4 जूनपासून लाडकी बहीण योजनेचा 11 हफ्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. 

राज्य सरकारने सरकारने लाडकी बहीण योजनेचे अर्ज आणि हफ्त्याच्या स्थितीची माहिती तपासण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ आणि ॲप उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही लॉगिन करुन तुमचा अर्ज क्रमांक, आधार क्रमांक किंवा मोबाइल नंबर टाकून तुम्ही हफ्त्याची स्थिती तपासू शकता. नारी शक्ती दूत ॲपवर अर्ज केला असेल, तर त्या ॲपवरही स्टेटस तपासता येईल. 

(नक्की वाचा-  ED Raid : अभिनेता डिनो मोरियाच्या घरावर ED ची छापेमारी; BMC कनेक्शनमुळे कारवाई?)

बँक अॅपवर तपासू शकता

लाडकी बहीण योजनेचा हफ्ता थेट तुमच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा होतो. त्यामुळे तुमच्या बँकेच्या नेट बँकिंग पोर्टल किंवा मोबाइल ॲपवर लॉगिन करून तुम्ही पैसे आले की नाही तपासू शकता. तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजना किंवा DBT नावाने पैसे जमा होतात. 

(नक्की वाचा-  Explainer: चिनाब रेल्वे पूलाचं स्वप्न अखेर पूर्ण! चीन-पाकिस्तानचं का वाढलं टेन्शन? वाचा संपूर्ण माहिती)

बँक स्टेटमेंटद्वारे तपासू शकता

याशिवाय जवळच्या एटीएमवर जाऊन मिनी स्टेटमेंटद्वारे देखील तुम्ही बॅलेन्स तपासू शकता. तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन पासबुक अपडेट करून हफ्त्याची माहिती घेऊ शकता. जर तुमच्या बँक खात्याशी मोबाइल नंबर लिंक असेल, तर हफ्ता जमा झाल्यावर तुम्हाला SMS अलर्ट मिळू शकतो.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com