जाहिरात

Jalgaon Crime : गोठ्यात वासरासोबत अनैसर्गिक कृत्य; अल्पवयीन मुलाच्या कृत्याने संताप, मुक्ताईनगर बंदची हाक

या घटनेच्या निषेधार्थ आज मुक्ताईनगर बंदची हाक देण्यात आली आहे.

Jalgaon Crime : गोठ्यात वासरासोबत अनैसर्गिक कृत्य; अल्पवयीन मुलाच्या कृत्याने संताप, मुक्ताईनगर बंदची हाक

मंगेश जोशी, प्रतिनिधी

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातल्या एका गावात अल्पवयीन मुलाकडून गाईच्या वासरासोबत नैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आला आहे. या घटनेमुळे मुक्ताईनगर तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या निषेधार्थ आज मुक्ताईनगर बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तातडीने दखल घेत घृणास्पद कृत्य करणाऱ्या मुलाला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये प्राणी अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये पुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या मुलाचे वय निश्चित नसल्याने सदर मुलगा हा अल्पवयीन असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या प्रकरणी पोलिसांकडून या मुलाच्या वयाचा शोध घेतला जात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

व्हिडिओवरून उघड झाला प्रकार
मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावात जनावरांच्या गोठ्यामध्ये काही लहान मुलांसमवेत संशयित मुलगा खेळत होता. त्याच वेळी त्याने गोठ्यातील एका प्राण्याच्या वासरासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकार हा एका व्यक्तीने आपल्या मोबाइलमध्ये कैद केला व यावरून हा संपूर्ण प्रकार समोर आला. अनेक संघटनांनी पोलिसात धाव घेत याप्रकरणी कारवाईची मागणी केली. दरम्यान पोलिसांनीही तातडीने या प्रकरणी गुन्हा दाखल करून या मुलाला ताब्यात घेतले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही घटना ज्या गावात घडली तेथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. 

Crime News : सुटकेसमधील धडाशिवाय सापडलेल्या मुंडक्याचं रहस्य उलगडलं; महिलेच्या इतक अवयवांचा शोध सुरू

नक्की वाचा  - Crime News : सुटकेसमधील धडाशिवाय सापडलेल्या मुंडक्याचं रहस्य उलगडलं; महिलेच्या इतक अवयवांचा शोध सुरू

वन्यजीव व प्राणी प्रेमी तसेच धार्मिक संघटनांकडूनही या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे. या घटनेमुळे मुक्ताईनगर तालुक्यातून संताप व्यक्त केला जात आहे. वन्यजीव प्रेमी तसेच प्राणी प्रेमी व विविध धार्मिक संघटनांकडूनही या घटनेचा कठोर शब्दात निषेध करण्यात आला आहे. याच अनुषंगाने आज मुक्ताईनगर बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये व्यावसायिकांनी स्वयं स्फूर्तीने सहभागी होत सकाळपासूनच आपली दुकाने बंद ठेवली आहेत. त्यामुळे मुक्ताईनगर शहरासह ग्रामीण भागातही 100% बंद पाळला जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: