
मनोज सातवी, प्रतिनिधी
मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 25 मार्च रोजीच्या रात्री कचराकुंडीत एक नवजात बाळ सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी त्या नवजात बाळाला नजीकच्या कूपर रूग्णाल्यामध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं. याप्रकरणी सहार पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. नवजात बाळाला कचराकुंडीत फेकून दिल्या प्रकरणी सहार पोलिसांनी विमानतळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारित हे बाळ कुणाचे ? याचा तपास सहार पोलिसांनी लावला आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विमानतळावर शौचालयाच्या कचराकुंडीमध्ये नवजात बाळ फेकल्याच्या प्रकरणी एक अल्पवयीन मुलीचं नाव समोर आलं आहे. ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली होती. त्याच्या विरोधात पालघरच्या केळवे सागरी पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती आहे.
नक्की वाचा - तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला अन् Live-in पार्टनरसोबत आयुष्याचा शेवट, प्रेमाची हादरवणारी कहाणी!
तसेच या प्रकरणी पोलीस अल्पवयीन पीडित मुलगी आणि तिच्या पालकांची देखील चौकशी करीत आहेत. आरोपी आणि पीडिता दोघेही अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तरी अनैतिक प्रेमसंबंधातून ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली होती. ही अल्पवयीन मुलगी मुंबई बाहेर जात असताना विमानतळावर शौचालयात तिची प्रसुती झाली. प्रसूतीनंतर अल्पवयीन मुलीने नवजात बाळ शौचालयातील कचराकुंडीत फेकलं. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 25 मार्चच्या रात्री कचराकुंडीत हे नवजात बाळ सापडले होतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world