जाहिरात

तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला अन् Live-in पार्टनरसोबत आयुष्याचा शेवट, प्रेमाची हादरवणारी कहाणी!

या तरुणाने प्रेयसीला मिळविण्यासाठी एक मर्डर केला होता. या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला अन् Live-in पार्टनरसोबत आयुष्याचा शेवट, प्रेमाची हादरवणारी कहाणी!

छत्रपती संभाजीनगरमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या दोघांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पैठण तालुक्यातील कातपूर येथून समोर आली आहे. नवनाथ जगधने आणि शितल दोडवे अशी मृतांची नावं आहेत. दोघांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ (30 वर्षे) आणि शितल (28 वर्षे) गेल्या अनेक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघांनी घराच्या टेरेसवर गोचीड मारण्याचं विषारी औषध घेत स्वत:च जीवन संपवलं. नवनाथने यापूर्वी शुक्रवारी 28 मार्च रोजी विहिरीत उडी मारण्याचा प्रयत्न केला होता.

Akola News : 'मृत्यूनंतर पत्नीला माझा चेहरा दाखवू नका', व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवत तलाठ्याने संपवलं जीवन

नक्की वाचा - Akola News : 'मृत्यूनंतर पत्नीला माझा चेहरा दाखवू नका', व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवत तलाठ्याने संपवलं जीवन

नवनाथ याला जन्मठेपेची शिक्षा असल्याने तो तुरुंगात होता. काही दिवसांपूर्वी तो पॅरोलवर सुटून बाहेर आला होता. त्याला 28 मार्चला पुन्हा तुरुंगात जायचं होतं. परंतू त्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली. शितलच्या पहिल्या लग्नानंतर तिला सहा वर्षांचा मुलगा होता. नवनाथने शितलच्या मुलाची हत्या केली. यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात तो शिक्षा भोगत होता. मात्र काही दिवसांपूर्वी तो तुरुंगातून घरी आला. तो शितलला भेटला. आणि दोघांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. अद्याप आत्महत्येचं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: