जाहिरात

Bhigwan Case: 'आमचं प्रेम, घरी वारंवार सांगितलं...' अपहरण झालेल्या तरुणीचे प्रतिज्ञापत्र, A टू Z स्टोरी समोर

मुलगी सध्या भिगवण पोलीस ठाण्यात असल्याची ही माहिती मिळत आहे. या संदर्भात विचारणा करण्यासाठी पोलिसांना जरी संपर्क साधला तरी पोलीस अधिकारी फोन उचलत नाहीत.

Bhigwan Case: 'आमचं प्रेम, घरी वारंवार सांगितलं...' अपहरण झालेल्या तरुणीचे प्रतिज्ञापत्र, A टू Z स्टोरी समोर

देवा राखुंडे, पुणे:

Bhigwan Kidnapping Case:  भिगवणमधील कथित अपहरण प्रकरणात पिडीत तरुणी आणि तरुण पोलिसात हजर झाल्यानंतर नवनवे खुलासे होत आहे. मी माझ्या इच्छेनेच झहीरसोबत पळून गेल्याचे तरुणीने स्पष्ट केले आहे. तरुणीने तसे प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे. मात्र तिच्या कुटुंबियांकडून हे अपहरणच असल्याचा दावा केला जात असून आमची मुलगी आमच्या ताब्यात पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

"आमच्या दोघांचं प्रेम, घरी सांगितलेलं"

तरुणीने दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, मी शेजारी राहणाऱ्या जहीर शेख सोबत मागील १ वर्षापासून प्रेमसंबंधात आहे. याची कल्पना माझ्या कुंटुंबातील माझी आई व २ भावंडांना होती. मी जहीर सोबत लग्न करणार आहे असे त्यांना वारंवार सांगितलेले होते परंतू त्यांचा आमच्या प्रेमविवाहाला विरोध होता म्हणून त्यांनी माझ्या इच्छेविरोधात  नात्यातील मुलासोबत लग्न ठरवले. मी वारंवार माझ्या आई वडिलांना सांगितले मात्र ते ऐकत नव्हते. त्यामुळे मीच झहीरला फोन करुन बोलावून घेतले आणि त्याच्यासोबत गेले, असं स्पष्ट केले आहे. 

Amravati News: खोटी डिग्री, बोगस डॉक्टर.. अमरावतीत सर्वात मोठी कारवाई; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ!

दुसरीकडे, कुटुंबीय मात्र हे अपहरण झाल्याचे सांगत आहेत. त्यादिवशी आम्हाला मारहाण करून आमच्या डोळ्यात चटणी फेकून आमच्या समोर माझ्या बहिणीला ते घेऊन गेले. ती स्वतःहून गेलेली नाही तिला बळजबरीने घेऊन गेले आहेत. आमची मुलगी आमच्या ताब्यात पाहिजे अशी मागणी तिच्या भावाने केली आहे. आता न तरुणीची आई आणि नातेवाईक बारामती शहर पोलीस ठाण्यात तरुणीला भेटण्यासाठी दाखल झाले आहेत. .पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. दोघांनाही आज न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती मिळत असून बारामती शहर पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

मिरची पूड टाकली होती का? अहवाल समोर

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात मुलीची आई आणि भाऊ यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकण्यात आली असं तक्रारीत म्हटलं होतं मात्र वैद्यकीय अहवालत मिरचीची पूड टाकली नसल्याची माहिती समोर आली आहे.  दुसरीकडे ज्या ठिकाणावरून मुलीचा अपहरण झाले त्या ठिकाणी मिरचीची पूड पडल्याचा पाहायला मिळाले. अपहरण केलं गेलं म्हणून सांगितले, मात्र मुलीने तिच्या भावाच्या मोबाईलवरून तिच्या प्रियकराला फोन करून या संदर्भात कल्पना दिली होती की आपण कुठे आहोत त्यानंतर ती फरार झाली. 

Pune Bhigwan Case: भिगवण प्रकरणात मोठा ट्वीस्ट! तरुण- तरुणी पोलिसात हजर; मुलीने सत्य सांगितलं...

य प्रकरणी पोलीस याबाबत कमालीची गुप्तता पाळत आहेत. बारामती शहर पोलीस  ठाण्याच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त  लावण्यात आलाय. मुलगी बारामती शहर पोलीस ठाण्यात असल्याचा सांगितलं जात आहे., मुलगी सध्या भिगवन पोलीस ठाण्यात असल्याची ही माहिती मिळत आहे. या संदर्भात विचारणा करण्यासाठी पोलिसांना जरी संपर्क साधला तरी पोलीस अधिकारी फोन उचलत नाहीत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com