जाहिरात

Navi Mumbai Fire : नवी मुंबई हादरली! लक्ष्मीपूजनाला घरातील दोन्ही लक्ष्मी हरपल्या; पहाटे झोपेतच अघटित घडलं

दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कामोठे परिसरात दुर्दैवी घटना घडली आहे.

Navi Mumbai Fire : नवी मुंबई हादरली! लक्ष्मीपूजनाला घरातील दोन्ही लक्ष्मी हरपल्या; पहाटे झोपेतच अघटित घडलं

राहुल कांबळे, प्रतिनिधी

Navi Mumbai Fire : दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कामोठे परिसरात दुर्दैवी घटना घडली आहे. आज (मंगळवार) सकाळी साडेपाचच्या सुमारास कामोठे सेक्टर 36 येथील एका घरामध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

कळंबोली अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, सकाळी साडेपाचच्या दरम्यान सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळताच दलाची टीम तात्काळ घटनास्थळी रवाना झाली. सकाळी सहा वाजता पथकाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. या घटनेत दोन जण गंभीर भाजले असून त्यांना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितले.

Navi Mumbai News: दिवाळीत मृत्यूचं तांडव; वाशीतील रहेजा कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग, चौघांचा मृत्यू, 10 जखमी

नक्की वाचा - Navi Mumbai News: दिवाळीत मृत्यूचं तांडव; वाशीतील रहेजा कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग, चौघांचा मृत्यू, 10 जखमी

प्राथमिक माहितीनुसार, मृत महिला अंदाजे ४५ वर्षांची असून तिची मुलगी १९ वर्षांची होती. हे दोघी झोपेत असतानाच शेजारील किचनमध्ये स्फोट झाला. हे घर डुप्लेक्स स्वरूपाचे असून प्रवेशद्वाराजवळच स्वयंपाकघर आहे. स्फोटामुळे आणि दाट धुरामुळे बेडरूममध्ये झोपलेल्या आई-मुलीला बाहेर पडता आलं नाही. त्यामुळे त्या दोघींचा आतमध्येच होरफळून मृत्यू झाला. अग्निशमन विभागाच्या तपासात असे समोर आले आहे की, घरात एकूण तीन गॅस सिलिंडर होते. त्यापैकी दोन सिलिंडरचा स्फोट झाला. सुदैवाने कुटुंबातील इतर दोन सदस्य त्यावेळी नाईट शिफ्टसाठी बाहेर कामावर गेले होते, त्यामुळे ते बचावले.

स्फोटाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी गॅस लिकेजमुळे ही दुर्घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. घटनेचा अधिक तपास कळंबोली पोलीस करीत आहेत. या दुर्दैवी घटनेने कामोठे परिसरात शोककळा पसरली असून दिवाळीच्या आनंदावर शोककळा पसरवणारी ही घटना ठरली आहे

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com