MPSC ची परीक्षा कशी होणार? रिक्त पदभरती कधी होणार? विद्यार्थ्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं 

MPSC च्या परीक्षांचं आयोजन खासगी संस्थांकडून केलं जाणार का? मुख्यमंत्री काय म्हणाले?

जाहिरात
Read Time: 2 mins

MPSC Exam : येत्या वर्षापासून यूपीएससीच्या (UPSC Exam) धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षाही वर्णनात्मक स्वरूपात घेण्यात येणार आहेत. विधान परिषदेत याबाबत बोलतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बऱ्याच गोष्टी स्पष्ट केला. आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा घेतल्या जातील. या निर्णयाचा फेरविचार केला जाणार नाही. याशिवाय युपीएससीनुसार एमपीएससी परीक्षांचे वार्षिक कॅलेंडर तयार केलं जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत बुधवारी स्पष्ट केलं.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

MPSC च्या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने..
लोकसेवा आयोगाच्या परीक्षा वर्णानात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय 2022 मध्ये घेण्यात आला होता. सुरुवातीला २०२३ मध्ये हा बदल करण्यात आला होता. मात्र विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर त्याची अंमलबजावणी 2025 पासून करण्याची घोषणा सरकारने केली आहे. या निर्णयाचा फेरविचार केला जाणार नसून तो मागे घेण्याचाही प्रश्न नाही, असंही फडणवीस म्हणाले. काही कोचिंग क्लासेसच्या चालकांनी विद्यार्थ्यांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी मुलांच्या भविष्यासाठी हा बदल गरजेचा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

नक्की वाचा - Aurangzeb's Tomb : औरंगजेब कबरीच्या वादात मुघला वंशजाची एन्ट्री, CM फडणवीसांची पंतप्रधान मोदींकडे केली तक्रार

MPSC च्या परीक्षा खासगी संस्था आयोजित करणार?
एमपीएससीच्या परीक्षा पारदर्शी असाव्यात. खासगी संस्थांकडून याचं आयोजन केलं जाऊ नये अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. यावर मुख्यमंत्री म्हणाले, प्रश्नपत्रिका तयार करणं आणि परीक्षेचं आयोजन एमपीएससीमार्फत केलं जातं. केवळ काही इन्स्फ्रास्ट्रक्चरसाठी खासगी संस्थांकडून मदत घेतली जाते. 

Advertisement

रिक्त पदांचं काय?
एमपीएससीच्या रिक्त पदांच्या भरतीबाबत ते म्हणाले, लवकर एमपीएससीच्या रिक्त तीन महत्त्वपूर्ण पदं भरली जातील आणि येत्या काळात मोठ्या संख्येने पदभरती केल्या जातील. सामान्य प्रशासन विभागाने अन्य राज्याच्या लोकसेवा आयोगाचं अध्ययन केलं आणि त्याच्या आधारावर एमपीएससीला नवं स्वरुप देण्याची योजना तयार केली जात आहे. आता एमपीएससी अंतर्गत वर्ग 1 आणि वर्ग 2 सह वर्ग 3 च्या परीक्षा देखील घेतल्या जाणार आहेत. सर्व परीक्षा वेळेवर पूर्ण व्हाव्यात, जेणेकरून उमेदवारांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, हा सरकारचा उद्देश आहे.

Topics mentioned in this article