Ladki Bahin Yojana Scam: महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सतत चर्चेत असते. विधानसभा निवडणुकीत फायदेशीर ठरल्याने या योजनेकडे राज्य सरकारचे विशेष लक्ष आहे. मात्र तरीही या योजनेत अनेक भ्रष्टाचार होत असल्याचे समोर येत आहे. अशातच आता लाडकी बहीण योजनेमध्ये आणखी एक नवा घोटाळा झाल्याचं समोर आला असून थेट परराज्यातून घुसघोरी झाल्याचं प्रकरण उघडकीस आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा झाला असल्याचा समोर आले आहे. कारण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी चक्क परराज्यातील बोगस लाभार्थींचे रॅकेट समोर आले आहे. लातूर आणि सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचे दाखवून बोगस लॉगिन आयडी तयार केले आणि त्याद्वारे चक्क 1हजार 179 अर्ज दाखल केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अर्ज दाखल केलेल्यांमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमधील रहिवासी दाखवले आहेत. प्रत्यक्षात हे नागरिक उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधील आहे. याबाबत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आता सोलापूर पोलीस चौकशी करणार असून आरोपींवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत नाही. असे स्पष्टीकरण महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी केले आहे. काही लाभार्थी महिला योजनेच्या अटी शर्तीनुसार अपात्र ठरत असल्याने स्वेच्छेने लाभाची रक्कम परत करत आहेत. तसेच ज्या महिलांकडून पुढील कालावधीतील लाभ नको असल्याबाबत स्वेच्छेने कळविण्यात येत आहे अशा महिलांची विनंती विचारात घेवून त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
( नक्की वाचा : 6 वर्षांपूर्वी केली शेजारच्या महिलेची हत्या, जामिनावर बाहेर आल्यावर तिच्या नवऱ्यासह सासूला संपवलं! )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world