जाहिरात
Story ProgressBack

लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट, लाभासाठी ही अट पूर्ण करावीच लागणार

‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजनेद्वारे राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत.

Read Time: 2 mins
लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट, लाभासाठी ही अट पूर्ण करावीच लागणार

‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचा लगबग सुरु आहे. राज्य सरकारने या योजनेसाठीचे निकष देखील जाहीर केले आहेत.  योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलेचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पात्रता 

लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्यातील  21 ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परितक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला, किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

(नक्की वाचा- 'लाडकी बहीण' योजनेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा तहसीलदार संघटनेचा इशारा, काय आहे कारण?)

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. लाभार्थ्याचे आधार कार्ड असावे. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, तर त्याऐवजी त्या महिलेचे 15 वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, 15 वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व जन्मदाखला यापैकी कोणतेही एक ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.), परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. 

सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपर्यंत असणे अनिवार्य आहे.) मात्र, पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट मिळणार आहे. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत अनिवार्य नाही. पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि योजनेच्या अटी- शर्तीचे पालन करण्याबाबतचे लाभार्थ्याचे स्वाक्षरीसह हमीपत्र आवश्यक आहे.

(नक्की वाचा- हृदयद्रावक! लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायला निघालेल्या महिलेचा वाटेतच मृत्यू )

योजनेसाठी कोण पात्र नसणार?

ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत मात्र अडीच लाख रुपये उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेतला असेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत, ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
कोकण रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, अतिवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत; कोणत्या एक्स्प्रेस रद्द?   
लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट, लाभासाठी ही अट पूर्ण करावीच लागणार
Monsoon session Maharashtra Legislative Council Speaker election will not be held now
Next Article
Monsoon session Maharashtra : विधान परिषद सभापती निवडणूक तूर्तास नाही? 
;