Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ( Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरू केली आहे. या योजनेचा लाभ 2.43 कोटींहून अदिक महिला घेत आहेत. या सगळ्या लाभार्थ्यांसाठी सरकारने एक सूचना जारी केली आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी X वर एक पोस्ट करत ही सूचना जारी केली आहे. या पोस्टनुसार 'माझी लाडकी बहीण योजना' चा लाभ घ्यायचा असेल तर सगळ्या पात्र महिलांना e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया सगळ्या लाडत्या बहिणींना 31 डिसेंबरच्या आत पूर्ण करायची आहे. e-KYC प्रक्रिया करण्यासाठी आता अवघे काही तास उरले असून ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर लाभार्थ्यांच्या खात्यात दर महिना 1500 रुपये येणार नाहीत.
नक्की वाचा: पुत्रदा एकादशी कधी आहे, 30 की 31 डिसेंबर? योग्य तारीख,शुभ मुहूर्त जाणून घ्या
E-KYC प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे का आहे ?
E-KYC (Electronic Know Your Customer) प्रक्रियेत आधार कार्डाद्वारे ओळख पटविण्याचे काम केले जाते. खऱ्याखुऱ्या लाभार्थी महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या योजनेतअंतर्गत गैरप्रकार टाळण्यासाठी 13 विविध पातळ्यांवर पडताळणी होते, ज्यामुळे ही योजना पारदर्शक होण्यास मदत होते असे शासनाचे म्हणणे आहे. या योजनेच्या लाभार्थी महिलांनी अर्ज करताना काही चुका केल्या असतील तर या चुका दुरुस्त करण्याची त्यांना अखेरची संधी मिळणार आहे. ज्या महिला विधवा आहेत किंवा ज्यांना वडील नाहीत त्यांच्यासाठी या योजनेसाठीच्या पोर्टलवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लाडक्या बहिणींनो...
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) December 27, 2025
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी E-Kyc प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख असून, आता केवळ शेवटचे ४ दिवस उरले आहेत.
सर्व लाडक्या बहिणींनी आजच आपली E-Kyc प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र… pic.twitter.com/LMxMlLqlsV
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नेमकी आहे तरी काय? (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून 2024 रोजी सुरू करण्यात आली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील म्हणजेच ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, त्या कुटुंबातील महिलांना दर महिना 1500 रुपये दिले जातात. ही रक्कम या महिलांच्या खात्यात थेट जमा केली जाते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 16 हफ्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. यापुढचे हफ्ते मिळवण्यासाठी e-KYC करणे बंधनकारक करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी E-KYC प्रक्रिया कशी करायची ?
- ladakibahin.maharashtra.gov.in या लिंकवर क्लिक करा.
- होमपेज वर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक करा
- आधार नंबर आणि कॅप्चा भरल्यानंतर OK द्या आणि OTP पाठवण्याची विनंती स्वीकार करा
- मोबाइलवर आलेला OTP भरा आणि व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करून घ्या
- सिस्टमद्वारे तुम्हाला e-KYC यापूर्वी झाले आहे की नाही हे सांगितले जाईल
- नसल्यास पती/वडील यांचा आधार क्रमांक टाकून ओटीपी व्हेरिफिकेशन करून घ्या
- जातीची कॅटेगरी निवडा
- कुटुंबातील कोणीही व्यक्ती सरकारी नोकरी करत नसावा किंवा पेन्शन घेत नसावा
- घरातील एक विवाहीत आणि एक अविवाहीत महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकते
- चेकबॉक्स टिक करून सबमिट बटन दाबा
- प्रक्रिया यशस्वी झाल्यासा मेसेज आल्यानंतर तुमचीe-KYC प्रक्रिया पूर्ण होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world