मुंबईमध्ये आजपासून पाच टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणी साठा कमी झाल्याने पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. तर पाच जूननंतर 10 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. मुंबईतील अप्पर वैतरणा धरणामध्ये वापरातील पाणीसाठा शून्य टक्के झाला आहे, तर इतर सहा धरणांमध्ये पाणी साठा हा आठ टक्के इतकाच शिल्लक आहे. पावसाळा सुरू होऊन उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणी कपात लागू राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मोडक सागर धरण, मध्य वैतरणा धरण, अप्पर वैतरणा धरण, भातसा धरण, तानसा धरण, विहार धरण आणि तुळशी धरण या सात धरणांतून मुंबईला दररोज 3 हजार 950 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लीटर पाण्याची गरज भासते. 29 मे रोजी सातही धरणांत 1 लाख 25 हजार 452 दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध असून राज्य सरकारने अतिरिक्त 2 लाख 28 हजार 140 दशलक्ष लीटर राखीव पाणीसाठा उपलब्ध केला आहे.
(नक्की वाचा: Good News : 24 तासात होणार मान्सूनचं आगमन, हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट)
उपलब्ध पाणीसाठा
29 मे रोजी धरणांतील पाणीसाठा
धरण | दशलक्ष लीटर | टक्के |
अप्पर वैतरणा | 0 टक्के | |
मोडक सागर | 20182 दशलक्ष लीटर | 15.65 टक्के |
तानसा | 39673 दशलक्ष लीटर | 27.35 टक्के |
मध्य वैतरणा | 22884 दशलक्ष लीटर | 11.82 टक्के |
भातसा | 34368 दशलक्ष लीटर | 4.7 टक्के |
विहार | 5998 दशलक्ष लीटर | 21.66 टक्के |
तुळशी | 8046 दशलक्ष लीटर | 29.17 टक्के |
एकूण | 125452 दशलक्ष लीटर | 8.67 टक्के |
यंदा 5.64 टक्के साठा कमी
वर्ष 2021-22 या दोन वर्षांत 15 ऑक्टोबरपर्यंत मान्सून सक्रिय होता. पण वर्ष 2023मध्ये ऑक्टोबर महिन्यात तुलनेने पाऊस पडलेला नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरण साठ्यात सुमारे 5.64 टक्के पाणीसाठा कमी आहे. सातही धरणांतील पाणी साठ्यावर पालिका अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहे. दररोज नियोजनपूर्वक पाणीपुरवठा केला जात आहे.
(नक्की वाचा : Delhi Heat Wave दिल्लीमध्ये का वाढलाय उन्हाचा तडाखा? राजस्थान -हरयाणाशी आहे कनेक्शन )
K S Hoshyalikar on Monsoon | 30 मे रोजी मान्सून केरळात... सर्वात मोठी बातमी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world