जाहिरात

Thane News: मुंबई-नाशिक हायवेवर मोठी कारवाई! तब्बल 2,364 बॉक्स दारू सापडली; 2,00,30,800 कोटींचा मुद्देमाल जप्त

Thane News: मुंबई-नाशिक हायवेवर पडघा टोल नाक्याजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई! 2 कोटी रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त, 16 चाकी वाहनासह दोघांना अटक. वाचा सविस्तर माहिती.

Thane News: मुंबई-नाशिक हायवेवर मोठी कारवाई! तब्बल 2,364 बॉक्स दारू सापडली; 2,00,30,800 कोटींचा मुद्देमाल जप्त
"Thane News: 2 कोटी रुपयांची गोवा व्हिस्की जप्त"
प्रतिकात्मक फोटो (Canva)

Thane News: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने गुरुवारी (12 मार्च) कारवाई करत मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा टोल नाक्याजवळ परराज्यातील मद्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत एकूण 2 कोटी 30 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावर 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, कोकण विभागाच्या भरारी पथकाला मुंबई-नाशिक महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पडघा टोल नाक्याजवळ सापळा रचण्यात आला. संशयास्पद वाटणाऱ्या 16 चाकी ट्रकची (क्रमांक MH-12-TV-9000) झडती घेतली असता, त्यात गोव्यातील 'स्पिरिट ऑफ स्मूथनेस व्हिस्की'चे 2,364 बॉक्स आढळले. या मद्याच्या बाटल्यांवर 'फॉर सेल इन ओन्ली मध्य प्रदेश' असे लिहिलेले होते. 

(नक्की वाचा: Pune Crime: मांजर, पोपट, पिंजरा.. दोन कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी, पुण्यातील धक्कादायक घटना)

पडघा टोल नाक्याजवळ 16 चाकी वाहन जप्त

या कारवाईत मद्याच्या साठ्यासह 16 चाकी वाहनासह आणि दोन मोबाइल फोन असा एकूण 2,00,30,800 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाहन चालकासह अन्य एका आरोपीला ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

(नक्की वाचा: Shocking News: घरामध्ये लिंगनिदान, नंतर अमानुष प्रकार.. पोट दाबून गर्भपात; क्रूर घटनेने महाराष्ट्र हादरला!)

ही धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख आणि सहआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या आदेशानुसार, विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागाच्या भरारी पथकाने यशस्वी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे आणि दुय्यम निरीक्षक रिंकेश दांगट करत आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू वाहतुकीवर प्रशासनाने अधिक कडक पावले उचलली असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट होत आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com