- अभिषेक मुठाळ
Mumbai Coastal Road: मुंबई कोस्टल रोडच्या बोगद्यातील भिंतींमध्ये असलेल्या काही जोडणी सांध्यातून पाणी झिरपत असल्याचे निदर्शनास आले आहे. 300 मीटर लांबीच्या अंतरामध्ये पाच ठिकाणी पाणी झिरपत असल्याची माहिती आहे. पाणी झिरपत असल्याने तीन सांध्यामध्ये ओलसरपणाही दिसतोय. जोडणीच्या दोन सांध्यांमध्ये टाकण्यात आलेले सिलिंगच्या सोल्युशनमध्ये (केमिकल) अंतर निर्माण झाल्याने पाणी गळती होत असावी, असे निदर्शन प्रथमदर्शनी नोंदवण्यात आले आहे.
काय करण्यात आल्या उपाययोजना?
मुंबई कोस्टल रोडच्या बोगद्यातील जोडणी सांध्यांमध्ये इंजेक्शनद्वारे पॉलिमर ग्राऊट सोडण्यात आले आहे. त्यामुळे सांध्यांच्या ठिकाणी पाणी झिरपणे थांबले आहे. सिमेंट कॉक्रिटमध्ये असलेली पोकळी भरून काढण्यासाठी या पॉलिमर ग्राऊटमुळे मदत मिळते. या गळतीमुळे बोगद्याचे बांधकाम, दर्जा किंवा वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही.
(नक्की वाचा: Coastal Road Tunnel: 12,000 कोटी रुपयांचा खर्च, तरीही कोस्टल रोडच्या बोगद्याला का लागली गळती?)
पॉलिमर ग्राऊटिंग म्हणजे काय?
सिमेंट काँक्रिटच्या बांधकामामध्ये काही कन्स्ट्रक्शन जॉइंट असतात. यातून जमिनीमध्ये असलेले पाणी झिरपते. या भेंगामध्ये इंजेक्शनद्वारे ग्राऊटिंग केले जाते. ज्यामुळे या कन्स्ट्रक्शन जॉइंटमध्ये केमिकल भरून त्याचा संपर्क जॉइंटमध्ये असणाऱ्या पाण्याशी येतो. यानंतर ग्राऊट प्रसरण पावते आणि पाणी गळती होणे आपोआप बंद होते. म्हणजेच जमिनीमध्ये असलेले कन्सट्रक्शन जॉइंट भरले जातात. पॉलिमर ग्राऊटिंग केल्यानंतर पुढील सात ते आठ दिवस त्याचे निरीक्षण केले जाते. यानंतर हे कन्स्ट्रक्शन जॉइंट पूर्णपणे बंद झाल्याचे अनुमान काढले जाते.
(नक्की वाचा: सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न स्वप्नच राहणार?; पहिल्या तिमाहीतील टेन्शन वाढवणारी आकडेवारी)
दुसरीकडे मुंबई कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये जोडणी सांध्यातून पाणी झिरपल्याचे निदर्शनास आल्याने आता याबाबत तज्ज्ञांमार्फत अभ्यास करून भविष्यात आणखी पूरक उपाययोजना करण्यात येतील. बोगद्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूस असलेल्या भिंतीमध्ये 40 जोडणी सांधे आहेत. या 40 जोडणी सांध्यांपैकी ज्या सांध्यातून पाणी झिरपत आहे किंवा ज्याच्या आजूबाजूला ओलावा निर्माण झाला आहे, अशा सर्व जोडणी सांध्यांवर ही प्रक्रिया करण्यात येणार आहे.
(नक्की वाचा: पश्चिम रेल्वे 13 तासांनंतरही विस्कळीत, वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू)
Mumbai Coastal Road Leak | पावसाळ्याआधीच कोस्टला रोडला गळती ? पाहणीसाठी शिंदे दाखल
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world