जाहिरात

Fraud News: तीन महिन्यात पैसा डबल! व्यवसायिकाला 41 लाखाला लुटलं, बाप लेकांविरोधात गुन्हा दाखल

अनिस खान यांनी त्यांना "व्यवसाय कर्ज" च्या नावाखाली ४१ लाख रुपये दिले. मात्र  सय्यद कुटुंबाने त्यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

Fraud News: तीन महिन्यात पैसा डबल!  व्यवसायिकाला 41 लाखाला लुटलं, बाप लेकांविरोधात गुन्हा दाखल

Fraud News:  तीन महिन्यात मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईच्या भायखळ्यामधून उघडकीस आला आहे. याप्रकरणी  झाकिरुद्दीन सय्यद आणि त्यांचे दोन मुलगे शाहबाज सय्यद आणि जबिल सय्यद यांच्याविरुद्ध जेजे मार्ग पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं? 

याबाबत दिलेल्या तक्रारीनुसार, अनिस खान हे जहाज बांधणीचा व्यवसाय करतात. अनिस खान सांना  मोठी रक्कम गुंतवल्यास तीन महिन्यांत लाखोंचा नफा मिळेल असे आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनानंतर  अनिस खान यांनी त्यांना "व्यवसाय कर्ज" च्या नावाखाली ४१ लाख रुपये दिले. मात्र  सय्यद कुटुंबाने त्यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

Satara Crime: क्लासला निघाली, पुण्यात पोहोचली! साताऱ्यातील विद्यार्थिनीसोबत भयावह प्रकार, शुद्धीवर येताच...

 आरोपींनी ४१ लाख रुपयांच्या बदल्यात २० लाख रुपयांचा अतिरिक्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. मात्र कालावधीनंतर, मूळ रक्कम किंवा नफा परत मिळाला नाही. खान यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे की झाकिरुद्दीन सय्यद यांच्याविरुद्ध यापूर्वीही फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पुण्यातही फसवणुकीच्या तक्रारी

पुणे जिल्ह्यातील ओतूर पोलिस ठाण्यातही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंतवणुकीच्या नावाखाली शेतकरी आणि इतरांना फसवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. दरम्यान, सय्यदने मोठ्या प्रकल्पांमध्ये सहभागी असलेला बिल्डर आणि व्यावसायिक असल्याचे भासवून लोकांचा विश्वास संपादन केल्याचे वृत्त आहे. सध्या, जेजे मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे आणि व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.

Shocking news: विधवा महिलेवर सलग 12 तास अत्याचार! एक- दोन नाही तर 'इतक्या' जणांनी तोडले लचके

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com