Mumbai Weather: मुसळधार पावसामुळे मुंबईची वाहतूक मंदावली, पाहा 10 VIDEO

Mumbai Heavy Rain: मुंबईत बुधवारी (25 सप्टेंबर) झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले होते, यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता.

Advertisement
Read Time: 2 mins

Mumbai Weather Update: मुंबईमध्ये बुधवारी (25 सप्टेंबर) संध्याकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. शहरामध्ये ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा तसेच हवाई सेवेवरही परिणाम झाला होता. सहा तासांमध्ये मुंबई शहरामध्ये 87.79 मिलीमीटर, पश्चिम उपनगरामध्ये 95.57 मिलीमीटर आणि पूर्व उपनगरामध्ये 167.48 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. 

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी

(नक्की वाचा: Live Update : मुंबई, ठाण्यात कसा असेल पाऊस? लोकलसेवा सुरू आहे का? प्रत्येक अपडेट जाणून घ्या)

रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. गुरुवारी (26 सप्टेंबर) देखील IMDकडून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आल्याने मुंबई महापालिकेने शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे.

घाटकोपर मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी 

स्पाइसजेट, इंडिगो आणि विस्तारा कंपन्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत काही विमानांचे उड्डाण वळवण्यात आल्याची माहिती प्रवाशांना दिली. 

(नक्की वाचा: पावसाचे डोके फिरले, मुंबईकर लटकले; प्रमुख रस्त्यांवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी)

हवामान विभागाने मध्य महाराष्‍ट्र, कोकण, गोवा, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि गुजरात भागामध्ये गुरुवारी (26 सप्टेंबर) अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. 

सौराष्ट्र आणि कच्छ, बिहार, अरुणाचल प्रदेशसह आसाम, मेघालयमध्येही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुसळधार पावसामुळे मुंब्रा बायपास रोड परिसरात भूस्खलन झाले होते.

मुंबईत बुधवारी (25 सप्टेंबर) दुपारपासून मुसळधार पाऊस पडत होता, यामुळे ठिकठिकाणी पाणी साचून वाहतूक विस्कळीत झाली होती. 

मुंबई शहर आणि  उपनगरांमध्ये पावसाचा ‘रेड अलर्ट' जारी करण्यात आल्याने शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली.  

मुंबईतील अंधेरी एमआयडीसी परिसरामध्ये उघड्या नाल्यामध्ये पडून 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.