
Mumbai Local Man helps Women deliver Baby Video:कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय महिलेची प्रसुती करणारा रँचो तुम्ही सिनेमात पाहिला असेल मुंबईतला मराठमोळा रिअल लाईफ रँचो सध्या तुफान चर्चेत आहे. मुंबईतील राममंदिर स्टेशनवर या तरुणाने आपल्या डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करत महिलेची प्रसृती केली. विकास बेद्रे असं या तरुणाचे नाव असून डॉक्टर मैत्रिण देविका देशमुखच्या (Dr. Devika Deshmukh) मदतीने त्याने हे कौतुकास्पद काम केले. या सर्व घटनेचा व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल होत असून दोघांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मुंबईत धावत्या लोकलमध्ये एका महिलेला प्रसूती वेदना सुरु झाल्या. राम मंदिर रेल्वे स्टेशनवर कोणत्याही मेडिकल सुविधा नव्हत्या. तेव्हा विकास बेद्रे हा मराठमोळा तरुण देवासारखा धावून आला, त्याने आपली डॉक्टर मैत्रिण देविका देशमुखला व्हिडिओ कॉल केला. डॉक्टर देविका यांनी विकास बेद्रेला व्हिडिओ कॉलवर प्रसूतीची संपूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप समजावून सांगितली. विकास बेद्रेनेही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार प्रत्येक सूचनेचं पालन केलं आणि रेल्वे स्थानकावर तिची सुखरूप प्रसूती केली. हा सगळा प्रसंग कसा होता? याबाबत विकास बेद्रे आणि डॉक्टर देविका देशमुख यांनी एनडीटीव्हीशी सविस्तर चर्चा केली.
पुरुषांनो, गाफील राहू नका! तुम्हालाही होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर; ही आहेत गंभीर लक्षणे
डॉ. देविका देशमुख यांनी सांगितला प्रसंग
"मला फोन आला तेव्हा मी पहिल्यांदा फोन आला तेव्हा मी त्यांना विचारले जवळपास हॉस्पिटल आहे का? मात्र जवळपास हॉस्पिटल नव्हते. मला धक्का बसला. मी त्यांना व्हिडिओ कॉलवरुन सर्व सूचना दिल्या. जवळच्या टपरीवरुन चाकू, लायटर आणला. लायटरने चाकू गरम करुन नाळ कापण्यात आली. मी दिलेल्या प्रत्येक सूचनेप्रमाणे विकासने काम केले. आम्हाला जे शक्य होतं ते केले, असं डॉक्टर देविका देशमुख यांनी सांगितले.
तसेच "तिला वाचवणे हे पहिले कर्तव्य आहे, असं मला वाटले, त्यातूनच आम्ही ही तत्परता दाखवली. विकासने विचारलं मी करु शकेन का? त्यावेळी मी त्याला धीर दिला. तु नक्की करु शकशील, फक्त जय श्रीराम म्हणं आणि कर. असं सांगितले. खर कौतुक हे विकास बेद्रे याचे आहे, त्याने पुरुष असूनसुद्धा महिलेच्या वेदना समजून घेतल्या अन् मदत केली, असंही त्या म्हणाल्या.
रियल लाईफ रँचोने सांगितला थरारक अनुभव
"माझ्या मनामध्ये भिती खूप होती. देविका मॅमच्या साहाय्याने मला धाडस मिळाले त्यांच्या सूचनेमुळेच मी हे करु शकलो. माझी फ्लाईट होती मात्र मी त्याचा विचार न करता त्या बाळाला आणि आईला मदत करणे गरजेचे मानले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी केले. माणुसकी जपण्याचा, संदेश देण्याचा यामागे हेतू होता. मी सिनेमॅटोग्राफर आहे, समोर दिसणारी गोष्ट हुबेहूब उतरवू शकतो, त्याचप्रमाणे सांगितलेली गोष्टही करु शकतो, असा विश्वास होता. देविका मॅमच्या सूचनांनी मला आत्मविश्वास आला. या मदतीनेच दोन जीव वाचले," असं विकास बेद्रे यांनी सांगितले.
राज ठाकरेंसाठी 'प्रेम'पत्र, काँग्रेससोबतचा संसार तुटणार? काँग्रेस नेते संजय राऊतांवर भडकले
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world