जाहिरात

Railway Mega Block : प्रवाशांनो वेळापत्रक पाहा, शनिवारी पश्चिम आणि रविवारी मध्य-हार्बर रेल्वेवर ब्लॉक

Mega Block News: पश्चिम रेल्वेवर शनिवारी तर मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक असणार आहे.

Railway Mega Block : प्रवाशांनो वेळापत्रक पाहा, शनिवारी पश्चिम आणि रविवारी मध्य-हार्बर रेल्वेवर ब्लॉक

Mega Block News: रेल्वे मार्गावरील मेगा ब्लॉकचे वेळापत्रक पाहून वीकेंडचा प्लान आखा. रेल्वे रूळ, सिग्नलिंग यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर शनिवारी (6 जुलै) रात्रकालीन आणि मध्य रेल्वेवर (7 जुलै) रविवारी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येईल. पश्चिम रेल्वेवर रविवारी (7 जुलै) दिवसकालीन कोणताही ब्लॉक नसेल.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मध्य रेल्वे : 

कुठे : ठाणे (Thane Railway Station) ते दिवा स्टेशनदरम्यान (Diva Railway Station) पाचव्या आणि सहाव्या मार्गावर मेगाब्लॉक असेल.

कधी : सकाळी 10.50 वाजेपासून ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत मेगाब्लॉक

परिणाम : सकाळी 9.46 वाजताची सीएसएमटी ते बदलापूर, सकाळी 10.28 वाजताची सीएसएमटी ते आसनगाव, सकाळी 10.28 वाजता, दुपारी 3.17 वाजताची कल्याण ते सीएसएमटी या जलद लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच या लोकल नियोजित थांब्यासह कळवा, मुंब्रा, दिवा येथे थांबतील. सकाळी 9.50 वाजताची वसई रोड- दिवा मेमू कोपरपर्यंत चालवण्यात येईल. कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यान लोकल रद्द करण्यात येणार आहेत. सकाळी 11.45 वाजताची दिवा-वसई रोड मेमू कोपरवरून चालवण्यात येईल.दुपारी 12.50 वाजता वसई रोड-दिवा मेमू कोपरपर्यंत चालवण्यात येईल. दुपारी 2.45 वाजता दिवा-वसई रोड मेमू कोपरवरून चालवण्यात येईल. रत्नागिरी-दिवा जलद पॅसेंजर पनवेल येथए स्थगित करण्यात येईल.

(नक्की वाचा: नियमांचे पालन करा...पळून जाऊ नका! पुण्यातल्या बिल्डरपुत्रानं 2 महिन्यांनी लिहिला 300 शब्दांचा निबंध)

हार्बर मार्ग

कुठे : कुर्ला (Kurla Railway Station) ते वाशी स्टेशनदरम्यान (Vashi Railway Station) अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी 11.10 वाजेपासून ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक

परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – पनवेल/बेलापूर अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. सीएसएमटी ते कुर्ला, पनवेल ते वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील.

(नक्की वाचा: NDTV EXCLUSIVE - पांढऱ्या माशीमुळे हाहा:कार, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे भयंकर नुकसान)

पश्चिम रेल्वे

कुठे : वसई रोड (Vasai Road) ते विरार स्टेशनदरम्यान (Virar Railway Station) अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : शनिवारी मध्यरात्री 11.15 वाजेपासून ते पहाटे 4.15 वाजेपर्यंत मेगाब्लॉक
परिणाम : ब्लॉक कालावधीत वसई रोड ते विरार स्थानकांदरम्यान सर्व धीम्या लोकल जलद मार्गावर चालवण्यात येतील. ब्लॉकदरम्यान काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लॉक नसेल.

NDTV Marathi | मरिन ड्राईव्हवरील गर्दी आवरण्यासाठी आणि परिस्थिती सावरण्यासाठी, वेल डन मुंबई पोलीस

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com