जाहिरात

Mumbai Mega Block: मुंबईकरांचा खोळंबा! तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, कधी अन् कुठे? डिटेल्स वाचून घराबाहेर पडा

रविवारी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचा लोकलच्या मेगा ब्लॉकमुळे चांगलाच खोळंबा होणार आहे. रविवारी लोकलच्या तिन्ही मार्गांवर तांत्रिक कामांमुळे मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आले आहे.

Mumbai Mega Block: मुंबईकरांचा खोळंबा! तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, कधी अन् कुठे? डिटेल्स वाचून घराबाहेर पडा

Mumbai Local Mega Block News:  मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. रविवारी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचा लोकलच्या मेगा ब्लॉकमुळे चांगलाच खोळंबा होणार आहे. रविवारी लोकलच्या तिन्ही मार्गांवर तांत्रिक कामांमुळे मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आले आहे. या मेगा ब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून नागरिकांची चांगलीच गैरसोय होणार आहे. कसा असेल तिन्ही मार्गांवरील मेगाब्लॉक? जाणून घ्या...

लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील या ब्लॉकमुळे लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आले असून, काही स्थानकांवरील थांबेही रद्द करण्यात आले आहेत.

BMC Mayor: मुंबईच्या महापौर ठरल्या! भाजपकडून उमेदवाराची घोषणा; शिवसेनेचा उपमहापौर

​मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सकाळी १०:४८ ते दुपारी ३:४५ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल विद्याविहारपर्यंत डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे करी रोड, चिंचपोकळी, मशीद आणि सँडहर्स्ट रोड या स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत. प्रवाशांनी पर्यायी व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

पश्चिम रेल्वे, हार्बरची स्थिती काय? 

​पश्चिम रेल्वेवरही शांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान जलद मार्गावर लोकल चालवण्यात येणार आहेत. परिणामी, विलेपार्ले आणि राम मंदिर स्थानकांवरील थांबे बंद राहतील. हार्बर मार्गाची स्थिती अधिक बिकट असून, पनवेल-CSMT दरम्यानच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळी ९:४५ ते दुपारी ३:४९ या कालावधीत हार्बरची वाहतूक विस्कळीत राहील. ट्रान्स-हार्बर मार्गावरही ठाणे-वाशी/पनवेल सेवा दुपारी ३:५३ पर्यंत बंद असेल. देखभाल कामांमुळे प्रवाशांची गैरसोय होणार असली तरी, तांत्रिक सुरक्षेसाठी हे काम आवश्यक असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

Eknath Shinde: पुष्पगुच्छ नको आणि सोहळेही नको! शिंदेंनी वाढदिवसाबाबत घेतला 'हा' कठोर निर्णय, कारण काय?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com