जाहिरात

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठी गूडन्यूज! पेट्रोल 5 रुपये स्वस्त दराने मिळणार; कधी अन् कुठे? जाणून घ्या...

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून मुंबईतील दुचाकी चालकांना पेट्रोल प्रतिलिटर 5 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे.  मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. 

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठी गूडन्यूज! पेट्रोल 5 रुपये स्वस्त दराने मिळणार; कधी अन् कुठे? जाणून घ्या...

Mumbai Petrol Cheaper by rs 5:  आखाती देशांतील युद्धाचा मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत असून देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. पेट्रोल डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असून या महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडे मोडले आहे. अशातच महागाईने होरपळणाऱ्या मुंबईतील सर्वसामान्य जनतेसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईमध्ये तब्बल ५ रुपये स्वस्त दराने पेट्रोल मिळणार आहे. नेमकी कुणी केली आहे ही घोषणा? वाचा...

Mumbai News: गांजा तस्करी करताना मॉडेलला अटक; मुंबई विमानतळावर कस्टमची मोठी कारवाई

मनसेचा सर्वसामान्यांना दिलासा, स्वस्तात मिळणार पेट्रोल 

समोर आलेल्या माहितीनुसार, दिवसेंदिवस वाढणा-या पेट्रोलआणि डिझेलच्या किमतीने हैराण असलेल्या मुंबईतील सर्वसामान्य जनतेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) दिलासा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून मुंबईतील दुचाकी चालकांना पेट्रोल प्रतिलिटर 5 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे.  मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. 

काय म्हणाले संदीप देशपांडे? 

"सर्वसामान्य जनता आज महागाईने होरपळत आहे. सरकार त्यांना कोणताही दिलासा देऊ शकत नाही. आमच्या कुवतीप्रमाणे एक दिवस का होईना, सर्वसामान्य दुचाकीधारकांसाठी आम्ही आज जे पेट्रोलचे दर आहेत त्यापेक्षा ५ रुपये स्वस्त दराने आम्ही मुंबईभर पेट्रोल देणार आहोत. एकूण ३६ पेट्रोल पंप आहेत ज्या पंपांवर दुचाकींसाठी ५ रुपये स्वस्त दराने पेट्रोल मिळेल," अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली आहे. 

(नक्की वाचा-  Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com