VIDEO : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'चं काम पूर्ण; इंजिनियरिंगचा अद्भूत नमुना, लवकरच प्रवाशांसाठी खुला, तारीख काय?

Mumbai Pune Expressway Missing Link : मुंबई-पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक अत्यंत चांगली बातमी समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai-Pune 'Missing Link' Project Completed : मुंबई-पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक अत्यंत चांगली बातमी समोर आली आहे. बहुप्रतीक्षित मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचं काम पूर्ण झालं आहे. या प्रोजेक्टशी संबंधित असलेल्या एक इंजिनियरने सोशल मिडिया एक्सवर एक व्हिडिओ शेअर करीत याबाबत माहिती दिली. मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प इंजिनियरिंगचा अद्भूत नमुना आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर मुंबई-पुण्यातील अंतर तब्बल ६ किलोमीटरपर्यंत कमी होईल. इतकच नाही तर २५ ते ३० मिनिटांची प्रवासाचा वेळ वाचेल. मिसिंग प्रकल्पाची एकूण लांबी १३.३ किलोमीटर इतकी आहे. यामध्ये ६५० मीटर लांब केबल ब्रिजचा समावेश आहे. याची एकूण उंची १८२ मीटर (६० मजली इमारत) आहे. 


सतीश मानेने शेअर केला व्हिडिओ...

सतीश माने नावाच्या एका वापरकर्त्याने एक्सवर यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम पूर्ण झाल्याचं त्यांनी एक्सवर माहिती दिली. माने यांच्या पोस्टनुसार, मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम १२ मार्चला पूर्ण झालं. सूत्रांच्या माहितीनुसार, या मिसिंग लिंक प्रकल्पाचा शुभारंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातून होऊ शकतं. मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पात टायगर व्हॅलीच्यावर एक ६५० मीटर लांब केबल-स्टेड पुल तयार करण्यात आला आहे. या खांबांची उंची साधारण १८२ मीटर असून ज्यामुळे हा पुल भारतातील सर्वात उंच रस्ते पुलांपैकी एक ठरतो. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने याची उभारणी केली आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Pune News : पुणेकरांचं निम्मं टेन्शन संपलं; मोठी कोंडी फुटणार, 8 भुयारी मार्गाचा कुणाला होणार फायदा?


मिसिंग लिंक कधीपासून सुरू होणार?

काही दिवसांपूर्वी आलेल्या अपडेटनुसार, या प्रकल्पाचं  ९८ टक्के काम पूर्ण झालेलं आहे. १ मे २०२६ (महाराष्ट्र दिन) रोजी हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प तयार करण्यासाठी साधारण ६,६९५ कोटींचा खर्च झाला आहे. या प्रकल्पात दोन मुख्य बोगद्यांचा समावेश आहे. एक बोगदा साधारण ८.९ किलोमीटर लांब आहे. हा देशातील सर्वात लांब बोगद्यांपैकी एक आहे. मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर खंडाळा घाट क्षेत्रात होणारे अपघात  आणि लँडस्लाइडमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका मिळेल. 

खोपोली एक्झिटपासून कुसगाव (लोणावळा) पर्यंतचा कठीण आणि वळणदार घाट विभाग या लिंकमुळे दूर होईल. अलिकडेच मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एक टँकर उलटल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली तेव्हा याची अत्यंत गरज होती.