जाहिरात

मुंबईत 107 वर्षातील सर्वाधिक पाऊस, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन! IMDकडून Red Alert जारी

Mumbai Rains News: मुंबईला सोमवारी पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय. शहरामध्ये 200 मिमीहून अधिक पावसाची नोंद करण्यात आलीय, ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक सेवेवर परिणाम झाला होता.

मुंबईत 107 वर्षातील सर्वाधिक पाऊस, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन! IMDकडून Red Alert जारी

Mumbai Rains News: महाराष्ट्रामध्ये मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला आहे आणि पहिल्याच पावसाने मुंबईला झोडपून काढले. रविवारी (25 मे 2025) रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर सोमवारी (26 मे2025) सकाळपर्यंत कायम होता. रिपोर्ट्सनुसार मुंबईमध्ये पावसाचा 107 वर्षांचा जुना रेकॉर्ड मोडलाय तसेच 75 वर्षात पहिल्यांदाच राज्यात वेळेपूर्वी मान्सून दाखल झाला आहे. 16 दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. IMDने 26 मे रोजी मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी केला होता आणि मुसळधार पावसाचाही अंदाज वर्तवला होता.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

Latest and Breaking News on NDTV

1918मध्ये मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद

मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. रेल्वे रुळांवरही पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. लोक रेल्वे स्टेशनवर अडकले होते. मुंबईमध्ये यापूर्वी 1918मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार, रविवारी उशीरा रात्रीपासून (25 मे) ते सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत दक्षिण मुंबईतील अनेक भागात 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला. शिवाय कुलाबा वेधशाळेमध्ये मुंबईत 295 मिमी पावसाची नोंद करण्यात आलीय, जी आतापर्यंतची सर्वाधिक पावसाची नोंद असल्याचे म्हटलं जातंय. यापूर्वीचा मे 1918 मध्ये 279.4 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती.  

(नक्की वाचा: Mumbai Rain Red Alert: मुंबईत कोसळधार, पाणी साचल्याने रस्ते-रेल्वे वाहतुकीवर परिणाम PHOTOS)

Latest and Breaking News on NDTV

मुंबईचा वेग मंदावला 

मुसळधार पावसामुळे मुंबईचा वेग मंदावला. दादर, परळ, किंग्स सर्कलसह अन्य परिसरातही पावसाचे पाणी साचले होते. काही ठिकाणी झाडे पडल्याच्याही घटना घडल्या. मुंबई मेट्रो लाइन 3ची वाहतूकही विस्कळीत झाली आहे. दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंट परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आलीय. 

(नक्की वाचा: Devendra Fadnavis: पावसाने हाहाकार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली मोठी माहिती)

Latest and Breaking News on NDTV

आयएमडीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सोमवारी सकाळी 8.30 वाजेपासून ते 11 वाजेदरम्यान कोणत्या भागात किती मिमी पावसाची नोंद करण्यात आली, जाणून घेऊया....

  • कुलाबा 105.2 मिलीमीटर पावसाची नोंद
  • सांताक्रूझ 55 मिलीमीटर पावसाची नोंद
  • वांद्रे 68.5 मिलीमीटर पावसाची नोंद 
  • जुहू एअरपोर्ट  63.5 मिलीमीटर पावसाची नोंद 
  • चेंबूर  38.5 मिलीमीटर पावसाची नोंद
  • विक्रोळी 37.5 मिलीमीटर पावसाची नोंद 
  • महालक्ष्मी 33.5 मिलीमीटर पावसाची नोंद
  • सायन 53.5 मिलीमीटर पावसाची नोंद

पावसाचा रेड अलर्ट 

आयएमडीने सोमवारी सकाळी मुंबईसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता पण यानंतर रेड अलर्ट जारी करण्यात आला. आयएमडीकडून सोमवारी दुपारी 12:38 वाजता मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com