
Mumbai to Konkan Ro-Ro service : कोकणवासियांना आता कोकणात जाण्यासाठी तासन् तास बसचे धक्के किंवा ट्रेनच्या गर्दीतून वाट काढावी लागणार नाही. लवकरच मुंबई ते कोकण अशी रो-रो सेवा सुरू होणार आहे. मुंबई ते रत्नागिरी आणि मुंबई ते सिंधुदुर्ग रो-रो चाचणी यशस्वीपणे पार पडली आहे. (Konkan News)
सुरुवातीला गणेशोत्सवापूर्वी ही सेवा सुरू करण्याचा सागरी मंडळाचा मानस होतो. गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी गणेश चतुर्थीच्या दोन ते तीन दिवसांपूर्वी ही सेवा सुरू करण्यात येणार होती. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ही सेवा सुरू होऊ शकली नव्हती. अखेर मुंबई (भाऊचा धक्का) ते रत्नागिरी (जयगड) आणि मुंबई (भाऊचा धक्का) ते सिंधुदुर्ग (विजयदुर्ग) रो-रो सेवा सुरू होणार आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. याशिवाय पर्यटकांना बोटीचा अनुभव घेता येणार आहे.
नक्की वाचा - Pune To Nashik : पुणे ते नाशिक अवघ्या 3 तासात, काय आहे सरकारचा प्लान; कसा असेल नवा महामार्ग?
रो-रोचं तिकीट किती असेल?
मुंबईहून कोकणात जाणाऱ्या रो-रो फेरी सेवेचं तिकीटही समोर आलं आहे.
इकॉनॉमी क्लास - २,५०० रुपये
प्रीमियम इकॉनॉमी - ४,००० रुपये
बिजनेस क्लास - ७,५०० रुपये
फस्ट क्लास - ९,००० रुपये
चारचाकी वाहन - ६,००० रुपये
दुचाकी - १,००० रुपये
सायकल - ६०० रुपये
मिनी बस - १३,००० रुपये
मुंबई ते सिंधुदुर्गमधील अंतर ४४२ किलोमीटर इतकं आहे. हे अंतर पार करण्यासाठी १० ते ११ तासांपर्यंत वेळ लागतो. तर मुंबई ते रत्नागिरीमधील अंतर ३२६ किलोमीटर असून ९ ते १० तासांपर्यंत वेळ लागतो. मात्र रो-रो फेरीमुळे मुंबई ते रत्नागिरी प्रवास ३ तास तर मुंबई सिंधुदुर्ग प्रवास अवघ्या पाच तासात पार करता येणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world