
Pune To Nashik Distance : पुणे ते नाशिक असा नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. पुणे ते नाशिक हा प्रवास अवघ्या तीन तासांत करता येणार आहे. सद्यस्थितीत पुणे ते नाशिक हा 214 किलोमीटरसाठी जवळपास 5 तासांचा वेळ लागतो. मात्र लवकरच हा प्रवास अवघ्या तीन तासात करता येणं शक्य होणार आहे.
काय आहे प्रकल्प?
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक फाटा ते राजगुरुनगर (खेड) हा तब्बल 28 किलोमीटरचा महामार्ग उन्नत होणार आहे. यासाठी या मार्गावर एलिव्हेटेड कॉरिडॉर बांधण्यात येणार आहे. त्यामुळे दीड ते दोन तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांवर होणार आहे. यामुळे मुंबईसह पुण्यासाठीही नाशिक अधिक जवळ येईल.
नक्की वाचा - Thane Metro : ठाणेकरांसाठी गूडन्यूज! ठाणे मेट्रोबाबतची मोठी अपडेट आली समोर
लवकरच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून 25 सप्टेंबरला निविदा खुल्या करण्यात येणार आहे. दुसरीकडे भूसंपादन प्रक्रियाही राबवावी लागणार असून एनएचएआयने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. 90 टक्क्यांपर्यंत भूसंपादन करण्याबाबत सांगण्यात आलं आहे. गेल्या वर्षी नाशिक - पुणे मार्गासाठी 7827 रोटी रुपये मंजूर करण्यात आले असून यामध्ये पुणे-नाशिक रुंदीकरण आणि उन्नत मार्गिकेचा समावेश आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world