जाहिरात

VIDEO: मुलाला 55 टक्के मार्क, कुटुंबाने केलं असं Unique सेलिब्रेशन; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

विशेष गोष्ट म्हणजे, त्या कुटुंबाने झैदसाठी अगदी त्याच्या गुणपत्रिकेसारखा दिसणारा केक बनवला होता. केकवर झैदचे नाव, रोल नंबर, आई-वडिलांची नावे आणि सर्व विषयांमधील गुण लिहिलेले होते.

VIDEO: मुलाला 55 टक्के मार्क, कुटुंबाने केलं असं Unique सेलिब्रेशन; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

Mumbai Marksheet Theme Cake Viral Video:  नुकतेच दहावी, बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल जाहीर झाले. या परिक्षेत काही विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळाले, काही काठावर पास झाले तर काहींना अपयशही आले. आता निकाल म्हटलं की विद्यार्थ्यांना टेन्शन येतंच. मार्क्स कमी पडले तर आई बाबा ओरडतील, रागावतील ही भिती प्रत्येक मुलाच्या मनात असते. अशावेळी पालकांनीही मुलांना समजून घेणे आवश्यक असते. असाच संदेश देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

Cyber Alert: सावधान! एक सेल्फी करेल आयुष्य उद्ध्वस्त; 'ही' पोझ देताना 100 वेळा विचार करा, तज्ज्ञांचा इशारा

मार्कपेक्षा मुलाच्या चेहऱ्यावरील आनंद मोठा... 

मुंबईतील एका कुटुंबाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, ५५ टक्के गुण मिळवलेल्या आपला मुलगा मोहम्मद झैद याचा आनंद साजरा करताना हे कुटुंब दिसत आहे. विशेष गोष्ट म्हणजे, त्या कुटुंबाने झैदसाठी अगदी त्याच्या गुणपत्रिकेसारखा दिसणारा केक बनवला होता. केकवर झैदचे नाव, रोल नंबर, आई-वडिलांची नावे आणि सर्व विषयांमधील गुण लिहिलेले होते.

झैदला इंग्रजीमध्ये ५७, मराठीमध्ये ४४, हिंदीमध्ये ५६, गणितामध्ये ५९, विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये ५५ आणि सामाजिक शास्त्रामध्ये ४९ गुण मिळाले आहेत. एकूण, त्याला ५०० पैकी २७६ गुण म्हणजेच ५५ टक्के मिळाले. व्हिडिओमध्ये, कुटुंब टाळ्या वाजवून झैदचे स्वागत करताना दिसत आहे. झैदसुद्धा हसतमुखाने येतो आणि गुणपत्रिकेच्या डिझाइनचा केक कापतो. 

आईच्या विचाराने लोकांची मने जिंकली
झैदची कुटुंबीय सदस्य, रुक्सार पटेल यांनी हा व्हिडिओ शेअर करत स्पष्ट केले की, त्यांच्या मुलाचा आनंद त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. त्या म्हणाल्या, "माझ्यासाठी, माझ्या मुलाचे ५५ गुण हे ९५ किंवा ८५ पेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत." मला त्याला ओरडायचे नाही किंवा त्याला वाईट वाटेल असे करायचे नाही. तो नेहमी आनंदी राहावा आणि कोणापेक्षाही कमीपणा त्याला वाटू नये, अशी माझी इच्छा आहे. दरम्यान, या व्हायरल व्हिडिओचे नेटकऱ्यांनी जोरदार कौतुक केले आहे. 

Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास महागणार; पर्यटकांमध्ये संताप, स्थानिकही झाले आक्रमक

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com