जाहिरात

Mumbai Water Cut: मुंबईकरांनी लक्ष द्या! 22 तास पाणीपुरवठा राहणार बंद, कधी अन् कुठे? वाचा....

 Mumbai Water Cut Update: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एन (N), एल (L), एम पश्चिम (M West) आणि एफ उत्तर (F North) विभागातील परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. 

Mumbai Water Cut: मुंबईकरांनी लक्ष द्या! 22 तास पाणीपुरवठा राहणार बंद, कधी अन् कुठे? वाचा....

 Mumbai Water Cut:  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) पाणीपुरवठा योजनेतील अत्यावश्यक दुरुस्तीच्या कामामुळे मुंबईतील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. येत्या १४ ते १५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान शहराच्या काही प्रमुख भागांत २२ तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.  या कालावधीत, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा आणि विहार  ट्रंक जलवाहिन्यांवरील  महत्त्वाच्या झडपा  बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून आणि काटकसरीने वापरून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 हे काम शुक्रवार, दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून शनिवार, दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत (एकूण 22 तास) सुरू राहणार आहे. त्यामुळे या 22 तासांच्या कालावधीत महानगरपालिकेच्या एन, एल, एम पश्चिम आणि एफ उत्तर विभागातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

या काळात १२०० मिमी व्यासाची जुनी तानसा, १२०० मिमी व्यासाची नवीन तानसा आणि ८०० मिमी व्यासाच्या विहार जलवाहिनीवरील ३०० मिमी, ६०० मिमी व ९०० मिमी व्यासाच्या एकूण पाच झडपा बदलण्याचे काम केले जाईल.  या दुरुस्तीच्या कामामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एन (N), एल (L), एम पश्चिम (M West) आणि एफ उत्तर (F North) विभागातील परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. 

Expensive Apple: 'हे' आहे जगातील सर्वात महाग सफरचंद, एका सफरचंदाच्या किंमतीत येतील 10 लक्झरी कार

कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद

एन विभाग (घाटकोपर आणि परिसर): राजावाडी पूर्वेकडील संपूर्ण परिसर, चित्तरंजन नगर, विद्याविहार परिसर, राजावाडी रुग्णालय, ओ.एन.जी.सी वसाहत, रेल्वे कर्मचारी वसाहत, आर.एन.गांधी मार्ग।

एल विभाग (कुर्ला आणि परिसर): न्यू टिळक नगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, साबळे नगर, संतोषी माता नगर, क्रांती नगर, नेहरू नगर, मदर डेअरी रस्ता, शिवसृष्टी रस्ता, नाईक नगर, जागृती नगर, केदारनाथ मंदिर मार्ग, एस.जी बर्वे मार्ग कुर्ला पूर्व, हनुमान नगर, पोलीस वसाहत, कसाई वाडा, चुनाभट्टी, राहुल नगर, एवराई नगर, कुरेशी नगर, तक्षशिला नगर, चाफे गल्ली, पान बाजार, त्रिमूर्ती मार्ग, व्ही एन पुरव मार्ग, उमरवाडी मार्ग।

चेंबूर (M पश्चिम विभाग, काही भाग) आणि वडाळा (F उत्तर विभाग, काही भाग): टिळक नगर, टिळक नगर स्टेशन रोड, पेस्तोम सागर रोड क्र. १ ते ६, ठक्कर बाप्पा कॉलनी (सेक्टर १ ते ४), शास्त्री नगर, वत्सलाताई नाईक नगर, सहकार नगर, शेल कॉलनी, इंदिरा नगर, एस.जी. बर्वे मार्ग, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे वर, भगवान कॉलनी, यशवंत नगर, सम्राट अशोक नगर, राजा मिलिंद नगर, आदर्श नगर, भक्ती पार्क, अजमेरा कॉलनी, एमएमआरडीए एसआरए कॉलनी

जबराट बर्थडे! लाखोंचा खर्च, DJ ची धूम, जेवण अन् बरचं काही, म्हशीच्या बर्थडेत गाववाल्यांची धमाल

या भागांमध्ये पाणीपुरवठा उशिरा सुरू

शीव (सायन): सायन (पूर्व आणि पश्चिम), सायन कोळीवाडा-सरदार नगर, संजय नगर, गांधी नगर।

वडाळा, माटुंगा, दादर (पूर्व): वडाळा, चुनाभट्टीचा काही भाग, प्रतीक्षा नगर, शास्त्री नगर, आल्मेडा कंपाऊंड, पंचशील नगर, वडाळा ट्रक टर्मिनल, सोडा बिल्डिंग्ज (न्यू कफ परेड), गायकवाड नगर, कोरबा मिठागर, वडाळा आणि भीमवाडीचे प्रवेशद्वार क्र. ४ आणि ५।

नागरिकांसाठी आवाहन: मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना विनंती केली आहे की, त्यांनी पाणीटंचाई (Water Scarcity) होऊ नये यासाठी पाणी जपून वापरावे आणि सहकार्य करावे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com