जाहिरात

Mumbai News: मुलुंड स्टेशनबाहेरील परिसराचा चेहरामोहराच बदलला! नागरिकांना काही तासात दिसला बदल

Mulund News: सरदार वल्लभभाई पटेल मार्ग हा मुलुंडमधील महत्त्वाचा रस्ता आहे. स्टेशन परिसरातील अनधिकृत बांधकामांमुळे येथे दररोज मोठी वाहतूक कोंडी होत होती.

Mumbai News: मुलुंड स्टेशनबाहेरील परिसराचा चेहरामोहराच बदलला! नागरिकांना काही तासात दिसला बदल

Mumbai News: मुंबईच्या उपनगरातील मुलुंड रेल्वे स्टेशन परिसरातील वाढत्या अतिक्रमणांविरोधात मुंबई महानगरपालिकेने (BMC) कंबर कसली आहे. मुलुंड पश्चिम येथील सरदार वल्लभभाई पटेल मार्गावर असलेल्या 61 अनधिकृत बांधकामे पालिकेच्या 'टी' विभागाने बुधवारी (11 फेब्रुवारी)  जमीनदोस्त केले. या धडक कारवाईमुळे रेल्वे स्थानक परिसरातील सुमारे 1100 चौरस मीटरचा परिसर मोकळा झाला असून, यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मोठ्या फौजफाट्यासह कारवाई

महानगरपालिका प्रशासनाने ही कारवाई अत्यंत नियोजित पद्धतीने पार पाडली. ही कारवाई उपायुक्त (परिमंडळ-6) संतोषकुमार धोंडे यांच्या देखरेखीत आणि सहायक आयुक्त (टी विभाग) श्रीमती योगिता कोल्हे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. अतिक्रमणे हटवण्यासाठी 4 जेसीबी, 7 डंपर आणि अन्य आधुनिक संयंत्रांचा वापर करण्यात आला. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी महानगरपालिकेचे 70 अधिकारी-कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Mulund Station

Mulund Station

(नक्की वाचा-  UP News: रात्री झोपी गेलेली तरुणी बनली 'नागीण'! सकाळी बेडरुमधील दृश्य पाहून अख्ख गाव हादरलं)

वाहतूक कोंडीतून होणार सुटका

सरदार वल्लभभाई पटेल मार्ग हा मुलुंडमधील महत्त्वाचा रस्ता आहे. स्टेशन परिसरातील अनधिकृत बांधकामांमुळे येथे दररोज मोठी वाहतूक कोंडी होत होती. या बांधकामांवर कारवाई झाल्यामुळे आता पादचाऱ्यांसाठी चालणे सोपे होणार असून रस्त्यावरील वाहतूक अधिक सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

(नक्की वाचा-  Ajit Pawar Plane Crash VIDEO: अजित पवारांच्या अपघाताचं नवीन CCTV Footage, विमानतळावर नेमकं काय घडलं?)

तोडक कारवाई सुरूच राहणार

अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांमुळे शहराच्या नियोजित विकासात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे आगामी काळातही अनधिकृत बांधकामांविरोधात अशीच कठोर कारवाई सुरूच राहील, असा स्पष्ट इशारा महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com