जाहिरात

Mumbai News: कलिंगड खाल्ल्याने चौघांचा मृत्यू? FDA च्या अहवालातून सर्वात मोठा खुलासा, प्रकरणात नवा ट्वीस्ट

अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) प्राथमिक तपासणीत खाद्यान्नामध्ये कोणतेही विषारी घटक आढळलेले नाहीत, त्यामुळे या मृत्यूंचे गूढ अधिकच गडद झाले आहे.

Mumbai News: कलिंगड खाल्ल्याने चौघांचा मृत्यू? FDA च्या अहवालातून सर्वात मोठा खुलासा, प्रकरणात नवा ट्वीस्ट

Mumbai Watermelon Death Case Update:  मुंबईच्या पायधुनीत एकाच कुटुंबातल्या चौघांच बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झाला होता. आता याचसंदर्भातला अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा अहवाल जाहीर करण्यात आलाय. यात कलिंगड किंवा मसाल्यांच्या नमुन्यांमध्ये भेसळ आढळली नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे चौघांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला होता का हे फॉरेन्सिकच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

कलिंगड, मसाल्यांच्या नमुन्यांमध्ये भेसळ नाही

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील ४ जणांच्या झालेल्या रहस्यमयी मृत्यूने पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) प्राथमिक तपासणीत खाद्यान्नामध्ये कोणतेही विषारी घटक आढळलेले नाहीत, त्यामुळे या मृत्यूंचे गूढ अधिकच गडद झाले आहे.

MSRDC News: 'मिसिंग लिंक'नंतर नव्या प्रोजेक्टची घोषणा; काय आहे 50,000 कोटींचा गेमचेंजर प्लॅन?

​२६ एप्रिल रोजी डोकाडिया कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला कलिंगड खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर एफडीएने घरातील बिर्याणी, कलिंगड, पाणी, तांदूळ, चिकन आणि मसाल्यांसह एकूण ११ नमुने गोळा केले होते. मात्र, या सर्व चाचण्यांचे अहवाल नकारात्मक आले असून अन्नात कोणतीही भेसळ नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

​दुसरीकडे, शवविच्छेदन अहवालात मृतांच्या शरीरात 'मॉर्फिन' या वेदनाशामक औषधाचे अंश सापडले आहेत. तसेच शरीरातील काही ऊतींचा (Tissues) रंग असामान्यपणे हिरवा पडल्याचे दिसून आले आहे. व्हिसेरा नमुन्यांच्या प्राथमिक तपासात काही अज्ञात बाह्य कण आढळल्याची माहिती कलिना फॉरेन्सिक लॅबच्या सूत्रांनी दिली आहे. पोलीस आता टॉक्सिकोलॉजी अहवालाची प्रतीक्षा करत असून, त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

VIDEO: पालघरमधील 2 मित्रांच्या मृत्यूचं गुढ उलघडलं! CCTVत दिसलं भयंकर दृश्य, भितीमुळे होत्याचं नव्हतं...

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com