आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज मातोश्रीवर निरीक्षक आणि उपनेत्यांची बैठक पार पडणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार असून आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलवण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी शिवसेना नेते उपनेते यांच्यासह निरीक्षक म्हणून पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली होती.
सुधाकर बडगुजर यांच्या पाठोपाठ विलास शिंदे देखील नाराज असल्याची चर्चा
नाशिकच्सुया धाकर बडगुजर यांच्या पाठोपाठ विलास शिंदे देखील नाराज असल्याची चर्चा
तुळजाभवानीच्या मंदिरातील दर्शन रांगेत भक्तात फ्री स्टाईल हाणामारी
तुळजाभवानी च्या मंदिरातील दर्शन रांगेत भक्तात फ्री स्टाईल हाणामारी
लहान मुलाने उलटी केल्याच्या कारणावरून महिला व पुरुषात हाणामारी
पंधरा ते वीस मिनिट सुरू होता मंदिरचा दर्शन रांगेत वाद
वीस मिनिटानंतर दर्शन रांगेचे नियोजन करणारे सिक्युरिटी गार्ड घटनास्थळी
तुळजाभवानी मंदिरात रविवार सुट्टी असल्याने भाविकांची दर्शनासाठी झाली आहे गर्दी
दर्शन रांगेतील काही ठिकाणचे फॅन पडले आहेत बंद
गर्दी व उकाडा सुरू असल्याने भाविकांमध्ये वाद वाढले प्रशासनाकडून दर्शन रांगेच्या नियोजनात चूक होत असल्याचा भाविकांचा आरोप
मालेगावच्या वाके फाट्यावर बस व ट्रकचा अपघात
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मालेगावच्या वाके फाट्यावर बस व ट्रकची सामोरा समोर धडक झाली आहे. या भीषण अपघातात बस चालक गंभीर जखमी झाला आहे. शिवाय 10 ते 12 प्रवासी किरकोळ गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अपघात इतका मोठा होता की बसचा समोरचा भाग अक्षरश : चक्काचूर झाला. जखमींना उपचारार्थ मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले
परभणी जिल्ह्यातल्या काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
परभणी जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला, पाऊस पडतोय तसा पेरणीपूर्व मशागतीच्या आणि हळद, कापूस लागवड करण्याच्या कामाला वेग आलाय तर दिवसभर होणाऱ्या गरमीच्या उकाड्यापासून थोडासा गारवा निर्माण होत आहे
पुण्याच्या बुशी डॅममध्ये दोघे जण बुडाले
पुणे जिल्ह्यातील भूशी डॅममध्ये पोहायाला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची आज घटना घडली. हे दोघे थेरगाव पुणे येथील आहेत. साहिल शेख आणि मो. जमाल असे या दोघांची नावे आहेत. शिवदुर्ग मित्र लोणावळा रेस्कु टिमला समजल्यानंतर त्यांनी या दोघांचे मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिले.
राज उद्धव एकत्र येण्यावर त्यांचे मामा काय म्हणाले
मी गेल्या अनेक वर्षांपासून दोघांनी एकत्र यावे यासाठी प्रयत्न केले होते असं उद्धव आणि राज यांचे मामा चंद्रकांत वैद्य यांनी सांगितलं. आता दोघांनी एकत्र यावे मला आनंद होईल .यावेळेस वातावरण चांगल आहे दोघेही सकारात्मक आहेत असं वाटतंय. खासकरून संजय राऊत प्रयत्न करत आहेत त्यामुळे हे शक्य वाटतंय. दोघेही सकारात्मक असल्याने निर्णय लवकर होईल अशी अपेक्षा आहे. आई तुळजाभवानीचे आशीर्वाद आहेत त्यामुळे एकत्र यावे वाटतंय असं ही ते म्हणाले.
मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन भावांडाचा शेततळ्यात बुडून मृत्यु
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या आगलावे गेवराई येथे मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन भावांडाचा शेततळ्यात बुडून मृत्यु झाला आहे. सतीश एकनाथ आगळे ( वय 18 वर्षे) , गौरव शिवाजी आगळे (वय १६ वर्ष) असे मृत्यू झालेल्या मुलांचे नावं आहेत. पैठण तालुक्यातील आगलावे गेवराई येथील सतीश आगळे व गौरव आगळे हे दोन भाऊ कुटुंबातील व्यक्ती लग्नासाठी बाहेर गावी गेले असता घरी एकटेच असल्याने त्यांनी शेततळ्यामध्ये मासे पकडण्यासाठी गेले. मासे पकडण्यासाठी ची जाळी फेकली. मात्र या जाळीमध्ये त्यांचा पाय गुंतून पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला आहे.
दोन्ही ठाकरेंची युती होणार नाही, मंत्री संजय शिरसाट यांचे भाकीत
उद्धव आणि राज ठाकरे यांची युती होणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. असं असताना शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. दोन्ही ठाकरेंची युती होणार नाही, असं भाकीत मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं आहे.
Live Update : राहुलजी ताउम्र ये भूल करते रहे, धूल चेहरे पर थी, आईना साफ करता रहे - देवेंद्र फडणवीस
Live Update : राहुलजी ताउम्र ये भूल करते रहे, धूल चेहरे पर थी, आईना साफ करता रहे - देवेंद्र फडणवीस
Live Update : छत्तीसगडमधील हिडमाच्या पूवर्ती गावात नक्षलवाद्यांनी एका गावकऱ्याची केली हत्या
छत्तीसगड राज्यातील हिडमाच्या पूवर्ती गावात नक्षलवाद्यांनी एका गावकऱ्याची हत्या केली
या घटनेला नक्षल्यांनी आज अंजाम दिला
हत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही
10 ते 15 नक्षलवाद्यांनी धारदार शस्त्रांचा वापर करून ही घटना घडवली.
या घटनेत सहभागी असलेल्या नक्षलवाद्यांचा शोध सुरक्षा दल घेत आहेत.
Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर
मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत करणार महा ऊर्जा नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन
तळेगाव येथे पुष्पलता डी वाय पाटील हॉस्पिटल चे करणार उद्घाटन
शिरूर येथे जॉन डियर ग्रुप कंपनीच्या कार्यक्रमाला फडणवीस राहणार उपस्थितीत
Live Update : विहिरीत पडलेल्या बिबट्याला दिले जीवदान
नाशिकच्या निफाड तालुक्यातील सायखेड्याजवळच्या सोनगाव शिवारात शिकारीचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाने दोन तास रेस्क्यू ऑपरेशन राबवित सुखरूप बाहेर काढत जीवदान दिले. बिबट्या विहिरीत पडल्याची शेतकरी विष्णू गावले यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ वन विभागाला माहिती देताच वन विभागाने तातडीने घटनास्थळी दाखल होत बिबट्याची सुटका केली . बिबट्यावर निफाड येथील वन विभागाच्या रोपवाटिकेत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केल्यानंतर बिबट्याला पुन्हा त्याच्या अधिवासात सोडून देण्यात आल्याची माहिती निफाड येथील वन विभागाने दिली आहे.
Live Update : शरद पवार आणि अजित पवार पुन्हा उद्या एकाच मंचावर
शरद पवार आणि अजित पवार पुन्हा उद्या एकाच मंचावर
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे होणाऱ्या कार्यक्रमाला दोन्ही नेते उपस्थित राहणार
या कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी ‘एआय’वर चर्चा सत्र
ऊस उत्पादनात वाढ करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापरावर उद्या मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एकदिवसीय चर्चासत्र
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील व कृषिमंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित राहणार
राज्यातील साखर कारखाने, सहकारी बँका व साखर उद्योगाशी संबंधित अधिकारी यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती
Live Update : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून बच्चू कडू पुन्हा आक्रमक...
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून बच्चू कडू पुन्हा आक्रमक...
आजपासून बच्चू कडू अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात करणार बेमुदत अन्नत्याग आंदोलन.
शेतकरी, अपंग,शिक्षक, दिव्यांग,शेतमजूर,मच्छिमार यांच्या साठी आंदोलन..
आज अमरावतीमधील संत गाडगेबाबा मंदिरापासून ते तुकडोजी महाराज यांच्या मोझरी येथील समाधी पर्यत काढणार बाईक रॅली..
बाईक रॅलीत 20 हजार शेतकरी आणि कार्यकर्ते येणार असल्याचा दावा..
Live Update : वादळी पावसाने शहराला झोडपले; मोठमोठी झाडे उमळून पडली
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार एन्ट्री धुळ्यात केली आहे.. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे धुळे शहरातील अनेक मोठमोठी झाडे उमळून पडले आहेत.. शहरातील परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या आवारातील दोन मोठे झाड पडल्याने तेथील व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.. धुळे शहरासह ग्रामीण भागात देखील वादळ वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. वारा वादळ सुरू होतात शहरातील वीज वितरण कंपनीने नेहमीप्रमाणेच वीज बंद करण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे
Live Update : धाराशिव जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार, मंत्री नितेश राणेंची घोषणा
धाराशिव जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार असल्याची घोषणा मत्स्य विभाग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. धाराशिव जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला चालना देऊन या व्यवसायासाठी भाजपा कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्याची मागणी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केली होती या मागणीला मंत्री नितेश राणे यांनी तत्काळ हिरवा कंदील दाखवला आहे. धाराशिव येथील प्रतिष्ठान भवन भाजप कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ही घोषणा करण्यात आली आहे.