
शरत सातपुते, सांगली
Maharashtra Assembly Session 2025: सांगली, इस्लामपूरजवळील विठ्ठलवाडी येथे डॉक्टर शुभांगी वानखडे (44 वर्ष) यांच्या आत्महत्येप्रकरणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाबाबत डॉ. गोऱ्हे यांनी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे प्रकरणाची तातडीने व सखोल चौकशी व्हावी, असे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत.
(ट्रेंडिंग बातमी - Pune News: पुण्यात मुंबईप्रमाणे लोकलसेवा सुरू होणार? विधानसभेत सरकारचं उत्तर काय?)
डॉ. शुभांगी वानखडे यांचा मृतदेह दोन दिवसांपूर्वी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्याच गाडीत संशयास्पदरित्या सापडला होता. त्यांच्या हातावर आणि गळ्यावर नसा कापल्याच्या गंभीर जखमा आढळून आल्या. ही आत्महत्या आहे की हत्या आहे हे शोधणे आवश्यक आहे, असे मत डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट व्यक्त केले आहे.
आत्महत्येस प्रवृत्त करणे किंवा धमकी देणे असे प्रकार आढळल्यास त्याचाही तपास करण्यात यावा. डॉ. शुभांगी वानखडे यांच्या मोबाईल फोन, पत्रव्यवहार, सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड्स, ई-मेल्स आणि सोशल मीडियावरील संवाद यांची सखोल तपासणी करून मृत्यूमागील खऱ्या कारणांचा शोध घेण्यात यावा, अशी सूचना करण्यात आली आहे.
डॉ. शुभांगी वानखडे यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात मानसिक, आर्थिक किंवा सामाजिक दडपण होते का, याचाही तपास करण्यात यावा. डॉ. गोऱ्हे यांनी मृत्यूपूर्वी कोणी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा थेट किंवा अप्रत्यक्ष दबाव टाकला होता का, याची शहानिशा करण्याची मागणीही केली आहे. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world