Nagpur Crime: नागपूरमध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी शोभायात्रेतून बेपत्ता झालेला 14 वर्षीय अथर्व दिलीप नैनोरे या अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नागपूरच्या गिट्टीखदान परिसरात गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी रात्री अथर्व बेपत्ता झाला होता. आता दोन दिवसांनी शनिवार दिनांक 4 मार्च रोजी नागपूरपासून कित्येक किलोमीटर दूर कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरतवाडा परिसरात रिंगरोडलगत त्याचा मृतदेह आढळून आला आहे.
बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडल्याने खळबळ!
समोर आलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या गिट्टीखदान परिसरातून अथर्व नैनोरे हा १४ वर्षीय मुलगा बेपत्ता झाला होता. गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या शोभायात्रेत तो शेवटचा दिसला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते, अशातच आता दोन दिवसानंतर शनिवार दिनांक 4 एप्रिल रोजी नागपूर पासून कित्येक किलोमीटर दूर कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरतवाडा परिसरात रिंगरोडलगत आढळून आला आहे.
Pune News : पुण्यातील पावसाचं 'अरबी कनेक्शन'; कशामुळे आभाळ फाटलं आणि शहर बुडालं? वाचा सर्व कारणं
एका पोत्यात त्याचे हातपाय बांधलेले होते आणि डोळे, जीभ आणि चेहरा अत्यंत विकृत अवस्थेत अशा अतिशय वाईट अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्याच्या चेह-यावर व शरीरावर अनेक घाव होते. त्याचा मृतदेह पाहून पोलिसदेखील आश्चर्य व्यक्त करत होते. अथर्वचा मृतदेह ज्या पोत्यात सापडला त्या पोत्यावरील ट्रेड मार्कवरुन आणि बॅच क्रमांक वरून आता मारेकऱ्यांचा शोध लागतो काय या दिशेने गिट्टीखदान पोलिसांचा तपास सुरू आहे.
शोभायात्रा मार्गावरील एका नर्सिग होम जवळील एका आईसक्रीम पार्लरच्या सीसीटीव्हीत तो दोन मित्रांसोबत जात असल्याचे दिसून आले आहे. या दोन मित्रांचा शोध घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी “आम्ही त्याला घरी चलण्यास सांगितले परंतू त्याने नकार दिला,” असे उत्तर दिले असल्याने पोलिस देखील बुचकळ्यात पडले आहेत.
नरबळी की हत्या? पोलिसांचा तपास सुरु
जर अथर्वचे अपहरण करुन हत्या करण्यात आली असेल तर मारेकरी त्याच्या परिचयाचे, किंवा नात्याचे आणि विश्वासाचे असावेत आणि त्यांना या भागाची इथ्थंभूत कल्पना असावी असे पोलिसांना वाटते. तो त्यांच्या सोबत गेला आणि मारेक-यांनी मुख्य मार्गावरील CCTV मध्ये दिसू नये या पद्धतीने त्याला सीसीटीव्ही नसलेल्या गल्लीबोळ्यातून नेले असा पोलिसांना संशय आहे. कारण तो किंवा त्याचे कोणीही संशयित मारेकरी कोणत्याही सीसीटीव्ही कॅमरामध्ये दिसलेले नाहीत. हत्या पैशांच्या वादातून झाली असावी,अशी दाट शंका व्यक्त केली जात आहे.
Pune News: शिरुर तालुका हादरला, मध्यरात्री नवरा-बायकोनं केला हवेत गोळीबार, नंतर असं काही घडलं..
याशिवाय, पौर्णिमेच्या दिवशी ही हत्या झाली असेल तर हत्येमागे नरबळीसारखे कारण आहे की काय या अनुषंगाने देखील पोलिस तपास करीत आहेत. पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र सिंगल यांनी स्वत: घटनास्थळी भेट दिली आणि अधिकाऱ्यांकडून तपासाचा आढावा घेतला. दरम्यान, अथर्वचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world