नागपुरात पुन्हा हिट अँड रन प्रकरण, 9 जणांना चिरडले; दोघांचा मृत्यू

नागपुरात पुणे हिट अँड रन प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. कारचालकाने नऊ जणांचा चिरडल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement
Read Time: 3 mins

हल्ली तरुणाईला बर्थ-डे पार्टी म्हटले की मद्याची धुंदी आणि नंतर फास्ट ड्रायव्हिंग; असेच काहीसे चित्र त्यांच्या डोक्यात असते. 20 वर्षीय भूषण लांजेवार आणि त्याचे पाच साथीदार विद्यार्थी अशीच बर्थडे पार्टी साजरी करून परतत असताना नागपुरात हिट अँड रनची घटना घडली. रविवारी (16 जून) रात्री 11.45 ते 12 वाजेदरम्यान शांतता पसरलेली असताना नागपूरच्या दिघोरी पोलीस स्टेशन अंतर्गत दिघोरी नाक्याजवळ या तरुणांची भरधाव कार अनियंत्रित झाली. यानंतर कार फूटपाथवर चढली आणि मोठा गोंधळ उडाला. फूटपाथवर राजस्थानातून आलेले काही लोक झोपले होते. हे सर्व जण या कारखाली चिरडले गेले आणि येथील शांतता किंकळ्यांमध्ये बदलली. 

(ट्रेंडिग न्यूज : कांचनजुंगा एक्सप्रेस व मालगाडीची धडक कशी झाली? एकावर एक चढले ट्रेनचे डबे, अपघाताची भीषणता दाखवणारे PHOTOS)

कारला नंबर प्लेटच नाही 

काय घडले आहे, हे समजताच कारमधल्या तरुणांनी गाडी मागे घेतली आणि जखमींना मदत करण्याचे सोडून त्यांनी पळ काढला. पोलिसांना माहिती मिळताच सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. दिघोरी नाका परिसरातून ती कार पुढे कुठे कुठे गेली? याचा शोध नियंत्रण कक्षेतील स्क्रीनवर घेतला गेला.  केवळ दीड तासात कारमधील सर्व सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांनी वापरलेल्या ह्युंदाई कारला नंबर प्लेटच नसल्याचे उघडकीस आले आहे. 

(ट्रेडिंग न्यूज: मुंबईच्या चोरासोबतच स्कॅम! 2 कोटींच्या दरोड्यासाठी मोठी तयारी, पण तोंडघशी पडले; नेमकं काय घडलं?)

जखमींना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण यातील दोन जणांचा मृत्यू झाला असून सात जणांवर उपचार सुरू आहेत. भूषण आणि त्याच्या मित्रांच्या बर्थडेच्या जल्लोषाची खरी झळ खेळणी विकून पोट भरणे आणि तिथेच रस्त्याच्या कडेला झोपणाऱ्या परप्रांतीय कुटुंबांना बसली आहे. 

Advertisement

हिट अँड रन प्रकरणांमध्ये वाढ होत असताना पालकांनी देखील काही गोष्टींचे भान जपणे आवश्यक आहे. आपला तरुण मुलगा किंवा मुलगी उशीरा रात्री घरी येत असल्यास त्यांच्याशी बोलणे, त्यांना समज देणे आवश्यक आहे. अल्पवयीन मुलगा किंवा मुलीच्या हाती वाहन दिल्यास वाहन मालक आणि पालकाच्या नावावर गुन्हे दाखल होतात, याचे विस्मरण होता कामा नये. 

(ट्रेडिंग न्यूज : सिक्कीममध्ये 1200 पर्यटक अडकले, महाराष्ट्रातील अनेकांचा समावेश; मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाचे निर्देश)

आरोपींना कठोर शिक्षा होणार?

दरम्यान या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा होईल, हे सुनिश्चित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. रात्रीची गस्त वाढवून 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'ची मोहीम तीव्र करावी, असेही त्यांनी पोलीस प्रशासनाला सांगितले आहे.

Advertisement

अटक  करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाचा वाढदिवस होता. सर्वांनी त्याचा वाढदिवस साजरा केला आणि लाँग ड्राइव्हसाठी निघाले असताना हा अपघात घडला. आरोपी 20 ते 21 वयोगटातील असून हे सर्वजण पुण्यामध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत, अशी माहिती उपायुक्त (झोन 4) विजयकांत सागर यांनी दिली आहे.

Nagpur | नागपुरात पुन्हा Hit & Run, रस्त्यावर झोपलेल्या 9 जणांना अल्पवयीन कारचालकानं चिरडलं

Topics mentioned in this article